Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापूस दरात सुधारणा

Cotton Rate : सध्या कापसाचे दर हमीभावाच्या पुढे गेले आहेत. दुसरीकडे दहा हजार पुढे असलेल्या तुरीच्या दरात घसरण झाली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : सध्या कापसाचे दर हमीभावाच्या पुढे गेले आहेत. दुसरीकडे दहा हजार पुढे असलेल्या तुरीच्या दरात घसरण झाली आहे. सध्या कापसाला ७ हजार ४०० रुपये, तर तुरीचे दर ९ हजार ७०० रुपयांवर आले आहेत.

यंदा सुरवातीपासून कापसाचे दर हमीभावाच्या खाली होते. गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते. यंदा कापूस उत्पादकांना फटका बसला आहे. कापूसविक्रीला सुरवात होण्याआधीच दर घसरले होते. कापसाला सुरवातीला ७ हजार ५०० रुपये दर मिळाले. मात्र, काही दिवसांत कापसाचे दर हमीभावाच्या खाली आले.

गेल्या काही दिवसांपर्यंत कापसाला ६ हजार ८००, तर कधी त्यापेक्षा कमी भाव मिळाला. आता कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे. कापसाला ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हे दर खर्चाच्या तुलनेत कमी आहेत. दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा कापूस विक्रीसाठी बाजारात आणायला सुरवात केली आहे.

यंदा कपाशीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला होता. त्यानंतर दरात घसरण झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांची स्थिती अडचणीची असतानाही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत.

दरम्यान, ११ हजार रुपयांवर गेलेल्या तुरीच्या दरातही घट झाली आहे. तुरीचे दर दहा हजार रुपयांच्या पुढे गेले होते. मात्र, यातही घट झाली आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल नऊ हजार ७१० रुपयेच दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

यंदा कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे दरवाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दर वाढण्याऐवजी घटले आहेत. तुरीचे दर दहा हजार रुपयांच्या पुढे गेल्याने समाधान होते. आता तुरीच्या दरात घट झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यंदा शासकीय केंद्रे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांसमोर खासगी बाजाराशिवाय पर्याय नाही.
- पुंडलिक गावंडे, शेतकरी, दारव्हा, जि. यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT