Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Bhavantar: सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवा, खरेदी १० दिवसांसाठी सुरु करा : रणधीर सावरकर

Randhir Savarkar Demand: सरकारने सोयाबीन खरेदी थांबवल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत आहे. यासाठी सरकारने १० दिवसांसाठी खरेदी पुन्हा सुरू करावी आणि भावांतर योजना लागू करावी, अशी आमदार रणधीर सावरकर यांची मागणी आहे.

Anil Jadhao 

Pune News: सरकारची हमीभावाने सोयाबीन खरेदी बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचणी वाढली. बाजारात कमी भाव मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीनची खरेदी किमान १० दिवसांसासाठी पुन्हा सुरु करावी आणि सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली. यावर राज्याच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे, असे राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत आज (ता.१०) सोयाबीनचा प्रश्न मांडला. सरकारने फक्त ३० टक्क्यांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी केली. उरलेले सोयाबीन शेतकऱ्यांना बाजारात विकावे लागत आहे. बाजारतही सोयाबीनचे भाव खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकरी आजही सोयाबीन खरेदीची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने सोयाबीनची खरेदी किमान १० दिवसांसाठी पुन्हा सुरु करावी, अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली.

सरकारने सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवावी, अशीही मागणी सत्ताधारी पक्षातील आमदार सावरकर यांनी केली. सरकारने सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना राबवावी. हमीभाव आणि बाजारभावातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी सावरकर यांनी केली.

प्रस्ताव प्रलंबितः रावल

सावरकर यांच्या मागणीवर बोलताना राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, केंद्राने राज्याला सोयाबीन खेरदीसाठी तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. राज्याने पुन्हा केंद्राकडे मुदतवाढीच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे. तसेच राज्यात जवळपास ११ लाख टन सोयाबीन खरेदी झाली. सोयाबीन उत्पादकांसाठी सरकारने विक्रमी खरेदी केली, असेही मंत्री रावल यांनी सांगतिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: १५ सप्टेंबरला अंतरवाली सोडणार, चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा

Pending Water Charges: ताकारीचे पाणी पाहिजे, आधी थकीत पाणीपट्टी भरा

MPSC Paper Leak : ‘एमपीएससी’ पेपरफुटीची सखोल चौकशी करा

Farmer Demands: मुक्ताईनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

Land Revenue Code: भडगाव तहसीलदारांचा पाय खोलात

SCROLL FOR NEXT