Soybean  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean : पामतेल नरमल्याचा सोयाबीनवर परिणाम होणार?

कोरोना काळात मजुरांची टंचाई भासल्याने जागतिक पामतेल उत्पादनावर परिणाम झाला होता. तसेच कोरोनामुळे पामतेल निर्यात ठप्प झाली होती. मात्र लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर जगभरात कंटेनर्सची टंचाई, भाडेवाढ आणि वाढलेली मागणी यामुळे दर वाढले.

टीम ॲग्रोवन

पुणेः मागील वर्षात भाव खाणाऱ्या पामतेलाचे दर (Palm Oil Rate)आता नरमले आहेत. इंडोनेशिया आणि मलेशियात उत्पादन (Palm Oil Production) वाढल्यामुळे पामतेलाचा साठा (Pam Oil Stock) वाढला आहे. त्यामुळे विविध देशांकडून मागणी वाढूनही दर उतरले आहेत. त्याचा परिणाम जागतिक बाजारात सर्वंच तेलबियांच्या दरावर (Oil Seed Rate) होतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे (Soybean Future Rate) बुधवारी एक टक्क्याने नरमले. तर भारतातही हजर बाजारात सोयाबीनचे दर (Soybean Rate) प्रति क्विंटल ६२०० रुपयांच्या आसपास आहेत.

कोरोना काळात मजुरांची टंचाई (Labour Shortage) भासल्याने जागतिक पामतेल उत्पादनावर (Global Palm Oil Production) परिणाम झाला होता. तसेच कोरोनामुळे पामतेल निर्यात ठप्प झाली होती. मात्र लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर जगभरात कंटेनर्सची टंचाई, भाडेवाढ आणि वाढलेली मागणी यामुळे दर वाढले. २०२१-२२ या वर्षात पामतेलाच्या दराने विक्रमी टप्पा गाठला होता. २०२१ मध्ये जागतिक पामतेल उत्पादन ७६२ लाख टनांवर स्थिरावलं होतं, असं अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएने सांगितलं. तर २०२२ मध्ये जागात पामतेल उत्पादन ७९१ लाख टनांवर पोचण्याची शक्यता आहे. यूएसडीएच्या मते चालू वर्षात इंडोनेशियात ४६५ लाख टन पामतेल उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर मलेशियात १९८ लाख टन, थायलंड ३२ लाख टन, कोलंबिया १८ लाख टन आणि नायजेरियात १४ लाख पामतेल उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

यंदा जागतिक पामतेल उत्पादन वाढीचा अंदाज आहे. त्यातच मागील हंगामात निर्यातीत असलेले अडथळे आता दूर होत आहेत. त्यामुळे पामतेलाचा पुरवठा सुरळीत होतोय. त्यामुळेही आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे दर कमी झाले. तसेच इंडोनेशिया सरकारच्या धोरणांचाही परिणाम दरावर झाला. इंडोनेशियाने एप्रिल महिन्यात पामतेल निर्यातीवर बंदी केली, त्यानंतर ती मागे घेत जून महिन्यात निर्यात वाढीसाठी धोरण जाहीर केले. इंडोनेशियात पामतेलाचे शिल्लक साठे आहेत. तसेच आता नवीन हंगामातील गाळप सुरु आहे. त्यामुळे इंडोनेशियाला देशातील साठे कमी करणे आवश्यक आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा वाढला. त्यामुळे दर नरमले आहेत.

जुलैच्या शेवटी इंडोनेशियात पामतेलाचा शिल्लक साठा जवळपास ८५ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. मलेशियात २० लाख टन साठा राहण्याची शक्यता आहे. सध्या पामतेलाचे दर कमी झाल्याने भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश यांच्याकडून आयात वाढली आहे. त्यामुळे बुधवारी बुर्सा मलेशिया एक्सचेंजवर पामतेलाचे वायदे ४.२२ टक्क्यांनी सुधारले होते. पामतेलाचे ऑक्टोबरचे वायदे ३९९२ रिंगीट प्रति टन दराने झाले. पण हा दर उच्चांकी दरापेक्षा जवळपास ४० टक्क्यांनी कमी आहे.

मागील वर्षात पामतेलाचे दर विक्रमी पातळीवर होते. त्यामुळे देशात सोयाबीनचेही दर तेजीत आले. कारण खाद्यतेल टंचाईमुळे उद्योगाकडून सोयाबीनला मागणी वाढली होती. पण आता पामतेलाचे दर नरमले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचेही दर कमी झाले. सीबाॅटवर बुधवारी सोयाबीनचे वायदे १४.६३ डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले. देशातही त्याचा परिणाम जाणवला. बुधवारी देशात हजर बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल ६ हजार ते ६ हजार २०० रुपये दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: खोडवा उसातील पाचट शेतीसाठी खते, औषधांसाठी ५० टक्के अनुदान

Sesame Production: खानदेशात तीळ उत्पादन कमी

Farmer Participation: धोरणात्मक निर्णयात हवा शेतकऱ्यांचा सहभाग

National Education Policy 2020: कोणत्याही भाषेची जबरदस्ती नाही

Paddy Harvesting: भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाकडे कल

SCROLL FOR NEXT