Sugar Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Price : साखरेच्या दरवाढीची आशा; शेतकऱ्यांना मिळणार फायदा?

Sugar Market : केंद्राने देशातील साखर कारखान्यांना जानेवारीसाठी २२.५० लाख टनांचा साखर कोटा विक्रीसाठी दिला आहे. गेल्या जानेवारीत हाच कोटा २२ लाख टन इतका होता.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : केंद्राने देशातील साखर कारखान्यांना जानेवारीसाठी २२.५० लाख टनांचा साखर कोटा विक्रीसाठी दिला आहे. गेल्या जानेवारीत हाच कोटा २२ लाख टन इतका होता. सध्या साखरेचे दर किमान विक्री दरापेक्षा २०० ते ३०० रुपयांनी अधिक म्हणजेच ३३०० ते ३४०० रुपये इतके आहेत.

संक्रातीला साखरेची मागणी येत असल्याने जानेवारीच्या पूर्वाधात साखरेच्या दरात क्विंटलला ५० रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात संक्रांत येणार येत आहे. तत्पूर्वी ही मागणी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिठाई उद्योगाकडून काही प्रमाणात साखरेचा उठाव वाढेल व तो साखर उद्योगास लाभदायक ठरेल, असा अंदाज आहे.

दरम्यान, साखर उत्‍पादक राज्यातील बहुतांशी साखर पट्ट्यामध्ये पावसाचा अडथळा फारसा नसल्याने आता या भागातील ऊस तोडणी व साखर निर्मिती वेगात होत आहे.यंत्रांचा वापर वेगात होत असल्याने उशीर झालेल्या ऊस हंगामाची भरपाई होत आहे. सध्या नवी साखर बाजारात येत आहे. व्यापाऱ्‍यांकडून जुन्या साखरेला मागणी कमी आहे. नव्या साखरेलाच मागणी असल्याने जुन्या साखरेचे काय करायचे असा प्रश्न कारखानदारांना भेडसावत असल्याने कारखानदार सूत्रांनी सांगितले.

गेल्या महिन्यापासून मागणी व दर फारसे नाहीत. अनेक ठिकाणी थंडीमुळे साखरेला औद्योगिक क्षेत्रातून मागणी फारशी नाही. सध्या घरगुती वापरासाठीच साखरेला मागणी आहे. संक्रांतीसाठी नव्या वर्षाच्या पहिल्या सप्‍ताहापर्यंत तरी मागणीत सातत्य राहण्याची शक्यता साखर उद्योगाची आहे.

उद्योगातून संतप्‍त प्रतिक्रिया

केंद्राने यंदाचा हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले, तरी अद्यापही साखर उद्योगाबाबत सकारात्मक निर्णय घेतले नसल्याने उद्योगातून संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेच्या एमएसपी वाढीबाबत जोरदार हालचाली सुरू होत्या. मंत्री, अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या होत्या.

याचवेळी यंदा साखर उत्पादन गेल्‍या वर्षी पेक्षा काहीसे घटेल असा अंदाज आल्यानंतर या बाबतच्या हालचाली पुन्‍हा थंडावल्या. एमएसपी वाढविली आणि उत्‍पादनही घटले तर किरकोळ बाजारात साखरेच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी शक्यता गृहीत धरून एमएसपी वाढीचा निर्णय मागे पडला. या बरोबरच इथेनॉल दर वाढीचा प्रस्‍ताव तयार असूनही यावरही निर्णय झाला नाही यामुळे साखर उद्योगात निराशा आहे. साखर उत्पादन कमी होण्याच्‍या शक्यतेने केंद्राने निर्यातीला परवानगी देण्याबाबत चर्चाही केली नाही.

साखर उद्योगासाठी या हंगामात सकारात्मक निर्णय होत नसल्याने यंदा एफआरपी देताना कारखान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे
पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT