Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : काश्मीरला जाणाऱ्या केळीला सर्वाधिक दर

Banana Rate : खानदेशात केळीची आवक सध्या प्रतिदिन ३५० ट्रकपेक्षा (एक ट्रक १६ टन क्षमता) अधिक आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात केळीची आवक सध्या प्रतिदिन ३५० ट्रकपेक्षा (एक ट्रक १६ टन क्षमता) अधिक आहे. दर्जेदार केळीचे दर १५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. दरही टिकून आहेत. उत्तरेकडे मागणी कायम आहे. काश्मिरात पाठवणुकीच्या केळीला सर्वाधिक १६०० रुपये प्रतक्विंटलपेक्षा अधिकचा दर आहे.

केळीची आवक रावेर, यावल, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागांत अधिक आहे. केळीचे दर ८००, १०००, १२०० रुपये प्रतिक्विंटल देखील आहेत. कमी दर्जाच्या केळीचे दर ८०० रुपयांपासून आहेत. मध्यम दर्जाच्या केळीचे दर १२०० ते १३०० रुपये आहेत.

उत्तरेकडील मॉल्स, श्रीनगर, दिल्ली येथे केळीची पाठवणूक बॉक्समध्ये पॅकिंग करून केली जात आहे. उत्तरेकडील खरेदीदार सावदा (ता. रावेर), रावेर, मुक्ताईनगर भागातील खरेदीदारांच्या मदतीने केळीचा पुरवठा करून घेत आहेत. पिलबाग केळीची काढणी रावेर, शिरपूर भागात पूर्ण होत आली आहे.

दर्जेदार मृग बहर केळी किंवा मागील वर्षी मे, जूनमध्ये लागवडीच्या केळी बागांतून केळीची आवक होत आहे. एकट्या रावेर, यावल व मुक्ताईनगर भागात रोज २६० ट्रकपेक्षा अधिक केळीची आवक होत आहे. सध्या जळगाव, चोपडा भागात केळीची आवक कमी आहे. कारण या भागात मृग बहर केळीची लागवड कमी असते. जामनेर, पाचोरा भागातही केळीची आवक बरी आहे.

एकसारख्या दरामुळे निर्यात कमी

केळीची परदेशातील निर्यात सध्या कमी आहे. परदेशात निर्यातीच्या व उत्तरेकडे मागणीच्या केळीचे दर एकसारखेच आहेत. यामुळे निर्यातीसंबंधी फारशी कार्यवाही खानदेशात सुरू नाही. काही कंपन्या मात्र रोज परदेशात केळीची पाठवणूक करीत आहेत. रोज १० ते १२ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात परदेशात सध्या होत असल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Protest: सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन; मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित

Agriculture Policy Controversy: केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांवर अनुदान मंजुरीवरून आरोप; भाजपने आरोप फेटाळले

Crop Insurance Data Discrepancy: पीकविमा नफ्याच्या आकडेवारीत विसंगती

Russia Fuel Shortage: युक्रेन युद्धामुळे रशियात इंधनटंचाई

Illegal Money Lending Act: अवैध सावकारीला आळा घालू; सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची कायद्यात बदल करण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT