Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : कुंभ मेळ्यानिमित्त केळीस मोठा उठाव

Banana Demand : कुंभ मेळ्यानिमित्त केळीला मागणी असून, दरात क्विंटलमागे किंचित सुधारणा झाली आहे. सध्या कमाल १७०० व किमान १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीस आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात पिलबाग किंवा खोडवा केळी पिकात काढणी सुरू झाली आहे. कुंभ मेळ्यानिमित्त केळीला मागणी असून, दरात क्विंटलमागे किंचित सुधारणा झाली आहे. सध्या कमाल १७०० व किमान १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीस आहे.

जुनारी किंवा काढणी ७० ते ८० टक्के पूर्ण झालेल्या केळी बागांमधील केळीचे दर १०००, ८०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. केळीचे दर मध्यंतरी कमी झाले. कमाल दर १५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. केळी पिकात चिलिंग इंज्युरी किंवा थंडीमुळे काही समस्याही आल्या. निर्यातीवर परिणाम झाला.

केळीची मागणी उत्तरेकडील थंडीमुळे घटली. यामुळे दर सतत कमी झाले. परंतु उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभ मेळ्यानिमित्त केळीस मागणी येत आहे. केळी दरात किंचित सुधारणा मागील तीन ते चार दिवसांत झाली आहे.

केळीची आवक खानदेशात कमीच आहे. कारण कांदेबाग केळीमधील काढणी पूर्ण झाली आहे. सध्या जळगावातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा आदी भागांत केळीची आवक आहे. तसेच धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागांतही पिलबाग केळी पिकातून आवक सुरू आहे. ही आवक कमी आहे. पण पुढील पंधरवड्यात आवकेत किंचित वाढ अपेक्षित आहे.

उत्तर प्रदेशातून मागणीत वाढ

सध्या खानदेशात रोज ४० ते ४५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. आवक नीचांकी स्थितीत आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही केळी आवक कमी आहे. उत्तरेकडे केळीची पाठवणूक सुरू आहे. अधिकची मागणी उत्तर प्रदेशातून आल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT