Hapus Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Hapus Mango Market : मुंबईत बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली ; दरात घसरण

मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक फळबाजारात हापूस आंब्याची आवकेत मोठी वाढ झाली आहे. आवक वाढल्यामुळे हापूसच्या दरात घसरण झाली आहे.

Team Agrowon

Hapus Mango Market मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक फळबाजारात हापूस आंब्याची आवकेत (Mango Arrival) मोठी वाढ झाली आहे. आवक वाढल्यामुळे हापूसच्या दरात (Hapus Mango Rate) घसरण झाली आहे.

त्यामुळे सध्या हापूसला १५०० ते चार हजार रुपये प्रति डझन असा दर हापूसला मिळत आहे. आवक वाढल्यामुळे हापूसच्या एका पेटीमागे तीन हजारांची घसरण झाली आहे.

दरवर्षी कोकणातून मोठ्या प्रमाणात मुंबईसह राज्याच्या इतर भागात हापूसची आवक होत असते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही आवक वाढतच जाते.

सध्या बाजारसमितीमधील आंब्याची विक्रमी आवक सुरू राहण्याची शक्यता आहे. परिणामी हापूसच्या दरात घसरण झाली आहे.

मुंबई एपीएमसीच्या घाऊक फळबाजारात शुक्रवारी (ता. ३१) ७३ हजार २९१ हापूसच्या पेट्यांची आवक झाली आहे. आवकेतील वाढ झाल्यामुळे हापूसचे दर १५०० ते चार हजारांवर आले आहेत.

वाशी बाजारात भाज्यांचे दर घसरले -

एकीकडे मुंबई बाजार समितीत आवक वाढल्यामुळे हापूसचे दर घसरले आहेत, तर दुसरीकडे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीपाला बाजारातही भाज्यांची आवक वाढल्यामुळे भाज्यांच्या दरात घट झाली आहे. वाशी बाजारात गुरूवारी (ता. ३०) भाज्यांच्या ६०० गाड्यांची आवक झाली. परंतु कमी उठावामुळे दर गडगडले.

आवक वाढल्यामुळे कारली, फरसबी, काकडी, शिमला आणि हरवी मिरचचे दर प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी घसरले. आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात आता बाजारातही शेतमालाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानात भर पडली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT