Team Agrowon
मागील सलग तीन दिवस रत्नागिरीत ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात पारा ४० अंशावर गेल्यामुळे फळगळीचे संकट होते. दक्षिणेकडील बागांमधील आंब्याची मोठ्या प्रमाणात गळ झाली.
सकाळी, सायंकाळी ढगाळ वातावरण असल्चाया परिणाम घनदाट आणि मोठी झाडे असलेल्या बागांना बसला आहे.
मोहोरातून फळधारणा होण्यावेळीच तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन मिळणे कठीण आहे.
राजापूरसह रत्नागिरी तालुक्यात पावसासह आजूबाजूच्या परिसरातील बागांमध्ये तुडतुड्यांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.
शेवटच्या टप्प्यात तरी चांगले पीक हाती येईल, अशी आशा बागायतदार बाळगून होते. पण बिघडलेल्या वातावरणामुळे त्यांच्या समस्येत वाढ झाली आहे.