Paddy Market
Paddy Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Paddy Procurement : चिपळूण तालुक्यात शासकीय भात खरेदीस प्रारंभ

Team Agrowon

चिपळूण, जि. रत्नागिरी ः चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाकडून (Co-operative buying and selling association) पेठमाप येथील गोदामात शासकीय आधारभूत किंमतीने भात (धान) खरेदी योजनेस (Paddy Procurement Scheme) प्रारंभ करण्यात आला. या निमित्त झालेल्या कार्यक्रमास संघाचे चेअरमन अशोक कदम, व्हाइस चेअरमन अजित कोकाटे, संचालक पांडुरंग माळी, दिलीप माटे, शिवाजी चिले, विजय शिर्के, दिलीप चिपळूणकर, दिनेश माटे, कृष्णा खांबे, संजीव गुजर, तुकाराम बंगाल, स्मिता चव्हाण, फिरोजा म्हाते, शेतकरी किसन निवाते, विकास घडशी, संघाचे व्यवस्थापक पांडुरंग कामळे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

भात खरेदी केंद्र चिपळूणप्रमाणे ताम्हणमळा पं. विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मिरवणे येथेही सुरू करण्यात येणार आहे. केंद्राचे उद्‌घाटन आज (ता. १७) सकाळी ११.३० वा. करण्यात येणार आहे.

संघामार्फत आकले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आकले येथेही भात खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. केंद्राचे उद्‌घाटन आज (गुरुवारी) दुपारी ३.३० वा. आकले येथे होणार आहे. कार्यक्षेत्रातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी या हमीभावाने खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघामार्फत करण्यात आले आहे.

अशी करा नोंदणी..

भातखरेदीसाठी शेतकऱ्यांनी ७/१२ ई-पीक पाहणी नोंद केलेला सात-बारा, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आणि स्वतः शेतकरी यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत संघामध्ये येऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. भातखरेदीची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२३ पर्यंत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT