Betel Leaf Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Betel Leaf Market : दिवाळीनिमित्त खाऊच्या पानाला चांगली मागणी

Betel Leaf Rate : दरात प्रतिडाग ७०० ते ८०० रुपयांची वाढ

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : गेल्या दीड ते दोन महिन्यांत खाऊच्या पानाला चांगली मागणी आहे. त्यामुळे उठावही होत आहे. दीड महिन्यापासून पानांचे दर टिकून होते. सध्या दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात मागणी वाढली आहे.

पानांच्या दरात डागाला ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात दर चांगले राहिल्याने पान उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या हंगामात पुरेसा पाऊस नसल्याने पानांच्या उत्पादनात घट झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून दरात चढ-उतार राहिला. बाजारपेठेत मागणी चांगली असल्याने पानांचा उठावही झाला. दरवर्षी गणपती, दसरा या सणाला दरात वाढ होते. त्यानुसार पानांच्या खुड्याचे नियोजन शेतकरी करत असतो.


सप्टेंबर महिन्यात फाफडा पानाच्या एका डागाला (एक डाग- १२ हजार पाने) ३५०० ते ७०००, तर कळीला १६०० ते ५००० रुपये असा दर होता. त्यानंतर प्रति डाग ३०० ते ४०० रुपयांनी दरात घसरण झाली. मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांत
पानांचे दर टिकून होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे शिल्लक राहिले.

सध्या दिवाळीचा सण सुरू झाला आहे. त्यामुळे बाजारात पानांच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पानांच्या खुड्याचे नियोजन केले आहे. सध्या कळी (एक डाग १२ हजार पाने) १७०० ते ३०००, तर फाफडा पानाला ३५०० ते ६५०० असा दर मिळत आहे.

यंदाचा हंगाम फायद्यात
कोरोनानंतर वर्षभर पानांच्या मागणीत घट झाली होती. त्याचा फटका दोन वर्षे बसला. गतवर्षी पीक चांगले असल्याने पानांची आवक आणि दर सातत्याने कमी-अधिक होत होते. त्यामुळे दर कमी मिळाला. यंदाच्या हंगामात अपुऱ्या पावसाचा परिणाम उत्पादनावर झाला.

त्यामुळे बाजारात आवक कमी आणि मागणी अधिक राहिली. त्यामुळे दरात वाढ झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात प्रति डागाला ४०० ते ५०० रुपये अधिक मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना निव्वळ नफ्यात ३ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे पान उत्पादकांनी सांगितले.

गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा हंगाम चांगला राहिला आहे. दोन पैसे शिल्लक राहिले. यंदा हंगामात अजून दोन पानांचे खुडे होतील. दरही टिकून राहतील, अशी आशा आहे.
- भाऊसो नागरगोजे, पान उत्पादक,नरवाड, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VBG-Ram-ji: ग्रामीण रोजगाराच्या हमीची ऐशी-तैशी

Indian Political Challenges: राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

SCROLL FOR NEXT