Ginger Farming Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Seed : आले बियाणे खरेदी अंतिम टप्यात

Ginger Market: आले लागवडीसाठी आवश्यक असणारे आले बियाणे काढणी व खरेदी अंतिम टप्प्यात आली आहे. आले पिकांच्या दरात मोठी घसरण झाल्याने बियाणे खरेदी कमी होत आहे.

विकास जाधव : अॅग्रोवन वृत्तसेवा

Satara News: आले लागवडीसाठी आवश्यक असणारे आले बियाणे काढणी व खरेदी अंतिम टप्प्यात आली आहे. आले पिकांच्या दरात मोठी घसरण झाल्याने बियाणे खरेदी कमी होत आहे. सध्या बियाण्यास १४ ते १५ हजार रुपये प्रति गाडी (५०० किलो) दर मिळत आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांत आले पिकास दराचा समाधानकारक गोडवा मिळाल्याने आले पिकाच्या क्षेत्रात जिल्ह्यात सातशे ते आठशे हेक्टर क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र मागील वर्षाच्या सप्टेंबरपासून दराला उतरण लागून आले पिकाचे दर गाडीला ५५ हजारांवरून आठ ते साडेनऊ हजारांवर आले असल्याने पुढील काळात दराबाबत साशंकता वाटत असल्याने बियाणे खरेदी करण्याकडे कल कमी झाला आहे.

बियाण्यांचे दर एक ते दोन हजार रुपयांनी कमी झाले असून गाडीस १३ हजार ते १५ हजार रुपये दराने खरेदी केली जात आहेत. मालाच्या प्रतवारीनुसार दरात कमी जास्त होत आहे. दरातील घसरणीमुळे जिल्ह्यातील किमान एक हजार हेक्टर क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे.

पुढील हंगामात अडीच हजार हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. मात्र दर काय राहतील यावरही क्षेत्र कमी जास्त होऊ शकते. धुणीच्या आल्यास आठ ते साडेनऊ हजार रुपये प्रति गाडी याप्रमाणे व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे.

दर कमी होईल या भीतीने आले काढण्याकडे कल आहे, मात्र व्यापाऱ्यांकडून सौदे कमी प्रमाणात होत आहेत. सौदा ठरवल्यानंतर आले काढणी लवकर होत नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे. जिल्ह्यात तापमान वाढल्याने आले पिकांच्या वजनातही घट होत असून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT