Ginger Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Rate : आले पिकास गाडीला ११ ते १२ हजार रुपये दर

Ginger Market : आले पिकाच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र मार्च महिन्यांच्या सुरुवातीपासून दरात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे.

विकास जाधव 

Satara News : आले पिकाच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र मार्च महिन्यांच्या सुरुवातीपासून दरात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. सध्या आले पिकास प्रति गाडी (५०० किलो) ११ ते १२ हजार रुपये दर मिळू लागला आहे.गाडी मागे एक ते दोन हजार रुपयांनी दरात सुधारणा झाली असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा निर्माण होऊ लागली आहे. नवीन लागवडीसाठी बियाणे खरेदीचे सौदे सुरू झाले असून दरातील अस्थिरतेमुळे या हंगामात क्षेत्रात घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिकांपैकी आले पीक असून बाजारात सातारी आल्यास स्वतंत्र मागणी असते. मागील वर्षी धुणीच्या आल्यास प्रतिगाडीस ५० ते ५५ हजार रुपये दर मिळाले होते, त्यामुळे बियाणे गाडीला ५५ ते ६० हजार रुपये इतक्या विक्रमी दराने आल्याची खरेदी झाली होती. मात्र जुलैनंतर आले पिकांच्या दर घसरण होण्यास सुरुवात झाली. डिसेंबरपर्यंत हे दर आठ ते नऊ हजार रुपये दर आले होते.

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत आठ ते दहा हजार रुपये दरम्यान दर स्थिर होते. दर घसरतील या भीतीने या काळात आले काढणीस शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले होते. फेब्रुवारीअखेर व मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. सध्या आले पिकास गाडीला ११ ते १२ हजार रुपये दर मिळत आहे.

तुलनेत एक ते दोन हजार रुपयांनी दरात सुधारणा झाल्याने पुढील काळात दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. मागील वर्षी विक्रमी दराने बियाणे खरेदी झाल्याने भांडवली खर्चात मोठी वाढ झाली होती. दर टिकून राहतील यामुळे आले क्षेत्रातही वाढ झाली होती. पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने कंदकुजीचा प्रादुर्भाव वाढल्याने आले टिकवण्यासाठी खर्च वाढला होता. आले नियंत्रणात येत नसल्याने काही शेतकऱ्यांकडून आले काढून टाकले होते.

बियाणे खरेदी प्रारंभ

नवीन लागवडीसाठी बियाणे खरेदी सुरू झाली आहे. बियाण्यास धुणीच्या आलेपेक्षा किमान चार ते पाच हजार रुपये जास्त मिळतो. सध्या बियाण्याच्या गाडीला (५०० किलो) १६ ते १६,५०० दर मिळत आहे. कंदकुजीमुळे आले बाधित झाल्याने निरोगी प्लॉट कमी झाले आहेत. यांचा फायदा व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे. चांगले प्लॉट शेतकऱ्यांकडून खरेदी करून बियाणे विक्री सुरू केली आहे. यामुळे बियाण्याचे कृत्रिम दरवाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र शेतकऱ्यांकडून प्रति गाडीला १६ ते १६,५०० दराने विक्री केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT