Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Bajarbhav : तुरीचे भाव आणखी पडतील की सावरतील? ; उत्पादनवाढीची शक्यता असली तरी परिस्थिती पूरक

Market Update : तुरीचा बाजार पुढील काही महीने ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Anil Jadhao 

Pune News : तुरीची लागवड यंदा १४ टक्क्यांनी वाढली. त्यामुळे आवकेचा दबाव वाढण्याआधीच तुरीचा बाजारभाव क्विंटलमागं २५०० रुपयांपर्यंत घट झाली. मात्र बाजारात आणि सरकारकडे गेल्या हंगामातील शिल्लक साठा नसणे, आयातीवरील मर्यादा तसेच सरकारची हमीभावाने खरेदी यामुळे तुरीच्या भावात फार मोठ्या मंदीची शक्यता नाही. तुरीचा बाजार पुढील काही महीने ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये महिनाभरापुर्वी तुरीचा सरासरी भाव १० हजार किंवा त्यापेक्षा काहीसा अधिक होता. नोव्हेंबरमध्ये तुरीला सरासरी १० हजार ते १० हजार ५०० रुपये भाव होता. आता मात्र तूर बाजारांमध्ये सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. म्हणजेच तुरीच्या भागात महिनाभरातच दोन ते अडीच हजार रुपयांनी भाव कमी झाले आहेत. देशातील सर्वच राज्यांमध्ये भाव कमी झाले. 

खरेतर सध्या बाजारातील नव्या तुरीची आवक खपूच कमी आहे. देशात तुरीचा शिल्लक स्टाॅकही नाही. आयात मोठ्या प्रमाणात होते, अशी देखील परिस्थिती नाही. तरीही नव्या हंगामातील माल बाजारात दाखल होतोय हे सेंटमेंट बाजारात निर्माण झाले. त्याचा परिणाम दरावर येत आहे. मात्र तुरीच्या बाजारात आणखी घसरण होईल, अशी परिस्थिती सध्या बाजारात दिसत नाही. 

देशात यंदा तुरीची लागवड गेल्यावर्षीपेक्षा १४ टक्क्यांनी कमी झाली. यंदा ४६ लाख ५० हजार हेक्टरवर तुरीचे पीक आहे. यंदा कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये लागवड वाढली. पण तूर पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटकाही बसला.

त्यामुळे लागवड वाढली तरी उत्पादनात पार मोठ्या वाढीची शक्यता दिसत नाही. सरकारने तर यंदा ३५ लाख टन उत्पादनाचाच अंदाज दिला. मात्र लागवड जास्त असल्याने उत्पादन यापेक्षा अधिक असू शकते, असे उद्योग आणि बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. सरकार आपल्या सुधारित अंदाजात उत्पादनाचा अंदाज वाढवू शकते. 

लागवड तब्बल १४ टक्क्यांनी वाढल्यामुळे उत्पादन वाढणार. मात्र उत्पादनात एवढीही वाढ होणार नाही की ज्यामुळे तुरीचा बाजार आणखी मोठ्या प्रमाणात पडेल. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे देशात जुन्या तुरीचा स्टाॅक खूपच कमी आहे. मागील हंगामातील स्टाॅक नसल्याने पुरवठ्याची भीस्त यंदाचे उत्पादन आणि आयात यावरच अवलंबून असेल. भारतात चालू वर्षी साडेआठ ते ९ लाख टनांपर्यंत आयात होऊ शकते, असा अंदाज आहे. मागील तीन वर्षांमध्ये आयात कमी अधिक प्रमाणात याच पातळीवर होत आहे. 

बाजारातील समिकरण

यंदाच्या खरिपातील गेल्यावर्षीपेक्षा उत्पादन वाढण्याची शक्यता असली तरी बाजारभाव खूपच पडणार नाहीत. तुरीचा सरासरी बाजारभाव ८ हजारांच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज आहे. आवकेचा दबाव वाढल्यानंतर बाजार ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान येऊ शकतो. पण यंदा सरकारकडेही तूर नाही.

सरकारने शेतकऱ्यांची पूर्ण तूर हमीभावाने खेरदीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे खुल्या बाजारात तुरीचा बाजारात जास्तच कमी झाला तर शेतकरी हमीभावाने तूर देतील. त्यामुळे यंदा हमीभावाचा मजबूत आधार तूर बाजाराला असेल. परिणामी तुरीचा बाजार यंदा हमीभावाच्या खाली जाण्याची शक्यता कमीच आहे. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते. हे समिकरण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी विक्रीचं नियोजन करावं, असं आवाहन तूर बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT