Chana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market : खानदेशात हरभरा आवकेत आणखी वाढ

Chana Rate : खानदेशात मोठा काबुली (डॉलर किंवा मेक्सिको) व अन्य हरभऱ्याची आवक सतत वाढत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात मोठा काबुली (डॉलर किंवा मेक्सिको) व अन्य हरभऱ्याची आवक सतत वाढत आहे. काबुलीच्या दरात मागील पंधरवड्यात क्विंटलमागे तीन ते सव्वातीन हजार रुपयांची घसरण झाली आहे.

२६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत खानदेशात गारपीट, वादळी पाऊस झाला. यात हरभऱ्याचे नुकसान झाले. परंतु ही समस्या दूर झाल्यानंतर हरभरा दरात सतत घट झाली आहे. मोठ्या व लहान प्रकारातील काबुली हरभऱ्याचे दर क्विंटलमागे तीन ते सव्वातीन हजार रुपयांनी घसरले आहेत. त्याची आवकही वाढली आहे.

खानदेशात मोठ्या काबुलीची आवक धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारातील शहादा व नंदुरबार, जळगावातील जळगाव, चोपडा व अमळनेर येथील बाजारांत होत आहे.

लहान व मोठ्या प्रकारातील काबुलीची आवक १५ ते १६ दिवसांपूर्वी खानदेशात प्रतिदिन सरासरी १५०० क्विंटल एवढी होती. परंतु सध्या मोठ्या काबुलीची आवक प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल आहे. एकट्या चोपडा बाजार समितीत रोज ७८० ते ८०० क्विंटल मोठ्या काबुलीची आवक होत आहे.

मोठ्या काबुलीचे दर फेब्रुवारीच्या मध्यात प्रतिक्विंटल १० ते १३ हजाल रुपये होते. सध्या मोठ्या काबुलीचे दर ९७०० ते १० हजार ६०० आणि सरासरी १० हजार १०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. चोपडा, जळगाव व शिरपूर येथे दरांमध्ये मोठा बदल होत नसल्याची स्थिती आहे.

लहान प्रकारातील काबुलीची आवक फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू झाली. सुरुवातीला लहान काबुलीचे दर सरासरी १० हजार रुपये प्रतिक्विंटल होते. सध्या त्याचे दरही ७००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. लहान काबुलीची चोपडा, अमळनेर, शिरपूर येथे मिळून रोज २१०० ते २२०० क्विंटल आवक होत आहे. सर्वाधिक आवक चोपडा येथे होत आहे.

देशी हरभऱ्याची आवकही वाढतीच

देशी प्रकारातील हरभऱ्याची आवकही सतत वाढत आहे. देशी हरभरा दरातही मोठी सुधारणा झाली नाही. त्याचे दरही ५२०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. त्याची आवक खानदेशात रोज तीन हजार क्विंटल होत आहे. देशी हरभऱ्याच्या आवकेतही सतत वाढ झाली असून, मागील २५ ते २८ दिवसांत दर ७०० ते ८०० रुपयांनी कमी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT