Sugarcane FRP Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugarcane FRP Payment : एफआरपीचे ८,१२६ कोटी रुपये ७० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात: केंद्रीय अन्नमंत्री जोशी यांची माहिती, गेल्यावर्षी ९९ टक्के पेमेंट देण्यात आले

FRP Payment Update : चालू २०२४-२५ च्या हंगामात पहिल्या ७० दिवसांमध्ये देशातील साखर कारखान्यांकडे ११ हजार १४१ कोटी रुपये एफआरपी देणी होती. त्यापैकी ऊस उत्पादकांना ८ कोटी १२६ कोटी रुपयांची एफआरपी कारखान्यांनी दिली.

Anil Jadhao 

Pune News : चालू २०२४-२५ च्या हंगामात पहिल्या ७० दिवसांमध्ये देशातील साखर कारखान्यांकडे ११ हजार १४१ कोटी रुपये एफआरपी देणी होती. त्यापैकी ऊस उत्पादकांना ८ कोटी १२६ कोटी रुपयांची एफआरपी कारखान्यांनी दिली. कर्नाटकमध्ये सर्वाधिक १ हजार ४०५ कोटी रुपये थकित आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात थकबाकी आहे, अशी माहीती केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेत दिली. 

देशात साखरेचा हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर मानला जातो. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या महत्वाच्या राज्यांमध्ये गाळप हंगाम जोमात सुरु आहे. गेल्या वर्षीच्या दुष्कामुळे ऊस लागवडी अनेक भागात काहीश्या कमी होत्या, असी माहिती काही कारखानदारांनी दिली. तसेच यंदा पाऊस पुरेशा प्रमाणात असल्याने ऊस लागवडीसाठी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे यंदा काही भागात लागवड वाढत आहे, असेही कारखानदारांनी सांगितले. 

देशात उसाच्या एफआरपीवरून अनेदा वाद-विवाद, आंदोलने होत असतात. संसदेतही अनेदा हा प्रश्न गाजत असतो. बुधवारी उसाच्या एफआरपीवरून सरकारला एक प्रश्न विचारण्यात आला होता. देशातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत किती एफआरपी अदा केली? या प्रश्नाला केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लेखी उत्तर दिले. 

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आपल्या उत्तरात म्हणाले की, १३ डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या उसाची ११ हजार १४१ कोटी रुपयांची एफआरपी साखर कारखान्यांकडे देणी होती. त्यापैकी पहिल्या ७० दिवसांमध्ये शेतकऱ्यांना ८ हजार १२६ कोटी रुपयांची एफआरपी कारखाण्यांनी दिली. अजून ३ हजार १५ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. थकीत एफआरपीपैकी कर्नाटकात सर्वाधिक १ हजार ४०५ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील कारण्यांकडे एफआरपी थकीत आहे.

गेल्या हंगामातील स्थिती
२०२३ च्या ऊस गाळप हंगामात कारखान्यांकडे एकूण १ लाख ११ हजार ६७४ कोटी रुपयांची एफआरपी आली होती. त्यापैकी कारखान्यांनी शेतकऱ्यांना १ लाख १० हजार ३९९ कोटी रुपयांची एफआरपी दिली. म्हणजेच ९९ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना अदा करण्यात आली. तर १ हजार २७५ कोटी रुपये अजूनही कारखान्यांकडे थकीत आहेत, अशी माहितीही मंत्री जोशी यांनी दिली. 

कारखान्यांनी गेल्या हंगामातील ९९ टक्के एफआरपी दिली आहे. यंदाही कारखाने शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी अदा करत आहेत. चालू हंगामात आतापर्यंत ८ कोटी १२६ कोटी रुपयांची एफआरपी कारखान्यांनी दिली. अजून ३ हजार १५ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. ही रक्कमही कारखाने शेतकऱ्यांना देतील. 
प्रल्हाद जोशी, केंद्रीय अन्नमंत्री 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT