Fish Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fish Market News : हर्णे बंदरात माशांचा लिलाव सुरू

Harne Port Fish Market : दापोली तालुक्यातील हर्णै बंदरातून रोजची मासळी खरेदी-विक्री आणि इतर उद्योग मिळून दररोज एक कोटींची उलाढाल होते.

Team Agrowon

Ratnagiri News : जिल्ह्यातील सर्वांत मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या हर्णे बंदारातील मासे लिलावाला नुकतीच सुरुवात झाली असून मासळीची विक्री होत असली तरीही म्हाकूळचा दर कमी असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे मच्छीमारांमध्ये निराशा आहे.

गतवर्षीचा माल अजूनही शिल्लक असल्यामुळे यंदा निर्यात कमी झाली असून स्थानिकपातळीवर त्याचे परिणाम जाणवत आहेत. दापोली तालुक्यातील हर्णै बंदरातून रोजची मासळी खरेदी-विक्री आणि इतर उद्योग मिळून दररोज एक कोटींची उलाढाल होते.

मागील महिन्यात विविध कारणांमुळे थांबलेली मासेमारी पुन्हा सुरू झाली आहे. सध्या मच्छीमार समुद्रात जाऊ लागल्यामुळे किनाऱ्यावर विक्रेत्यांची लगबग सुरू झाली आहे. हर्णेतील लिलाव सुरू झाल्यामुळे खरेदी-विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे.

सध्या बांगडा, म्हाकूळ बऱ्यापैकी मिळत आहेत. पण त्याला अपेक्षित दर नाही. बांगडा ३० ते ३५ रुपये किलो, तर म्हाकूळ १९० रुपये किलो दराने विकले जात आहे. गतवर्षी म्हाकूळचा दर २५० रुपये किलो होता. त्यामुळे मच्छीमारांमध्ये निराशा आहे.

- मासळीच दर

मासे किलोचे दर (रुपये)

* सुरमई ६०० ते ८००

* पापलेट १०००

* बांगडा ३० ते ३५

* म्हाकूळ १९०

* मोठा बळा १९०

* छोटा बळा ७० ते ८०

* छोटी वाघटी ३०

मासळी कमी प्रमाणात मिळत आहे. मोठ्या उलाढालीसाठी अजून वाट पहावी लागेल. काही नौका खोल समुद्रात मासेमारीला गेल्या आहेत. सुट्टीवेळी खरेदी-विक्री झाली होती. निर्यात कमी झाली की दरावर परिणात होतो. सध्या म्हाकूळला गतवर्षीच्या तुलनेत कमी दर मिळत आहे. दर कमी झाला की मासेमारी परवडत नाही.
- नंदू चौगुले, मच्छीमार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irle Dam Land Compensation: इर्लेतील बंधाऱ्याचा मोबदला तब्बल २९ वर्षांनी मिळाला

Cow Dung Machine: गोवरी निर्मिती यंत्राच्या डिझाइनला पेटंट

Revenue Office Citizen Hours: महसूल अधिकाऱ्यांचा दुपारी ३ ते ५ वेळ नागरिकांसाठी राखीव

Agricultural Electricity Issue: विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त

Cotton Processing Season: कापूस प्रक्रियेला दसऱ्यानंतर वेग येणार

SCROLL FOR NEXT