Dadar Jowar
Dadar Jowar Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dadar Jowar : शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी दादर ज्वारीचा साठा संपला

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील प्रमुख रब्बी पीक (Rabi Crop) असलेल्या दादर ज्वारीचे दर (Jowar Rate) यंदा स्थिर राहिले आहेत. सरासरी दर ३ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल, असे राहिले आहेत. तसेच कडब्यालाही दराची झळाळी कायम आहे.

दादर ज्वारी खानदेशात हुकमी पीक आहे. पाऊसमान चांगले राहिल्याने कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी (Dadar Jowar Sowing) अपेक्षेपेक्षा अधिक झाली होती. खानदेशात यंदा सुमारे ३५ हजार हेक्टरवर दादर ज्वारी पीक होते. सर्वाधिक पेरणी जळगाव जिल्ह्यात झाली होती.

दिवाळीनंतर कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी वेगात सुरू झाली. तापी, गिरणा, पांझरा, अनेर, बोरी, सुसरी आदी नद्यांच्या क्षेत्रातील काळ्या कसदार जमिनीत अधिकची पेरणी करण्यात आली.

पिकास फवारणी, बियाणे, खते आदींचा कुठलाही खर्च नसल्याने दादर ज्वारीची पेरणी खानदेशात अनेक शेतकरी करतात. तसेच कसदार कडबादेखील दादर ज्वारीतून उपलब्ध होतो. जमिनीत वाफसा चांगला राहिल्याने पीकवाढ जोमात होती. तसेच निसवणदेखील चांगली होती.

ज्वारीची मळणी फेब्रुवारी व मार्चमध्ये झाली. एकरी १० ते ११ क्विंटल एवढे उत्पादन हाती आले. काही शेतकऱ्यांनी विद्यापीठांकडून संशोधित वाणांची पेरणी केली होती.

अशा शेतकऱ्यांना एकरी १४ ते १४ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. सुरवातीला दर ४५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले.

जळगाव बाजार समितीत मार्चच्या मध्यापासून ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतिदिन सरासरी तीन हजार क्विंटल दादर ज्वारीची आवक झाली.

तसेच जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर बाजार समितीतदेखील आवक चांगली होती. दादर ज्वारीस त्या वेळेसही उठाव होता.

तसेच सध्यादेखील मागणी आहे. दरात हळूहळू घसरण झाली. एप्रिलअखेरपर्यंत दर ३००० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. कमाल शेतकऱ्यांना दर ३००० ते ३२०० रुपये असेच मिळाले.

बाजार समित्यांत अत्यल्प आवक

एप्रिलअखेरीस दादर ज्वारीची आवक कमी झाली. या महिन्यात अत्यल्प आवक बाजार समित्यांत होत आहे. कारण फारशा शेतकऱ्यांकडे दादर ज्वारीचा साठा नाही. सध्या खरेदीदार ते खरेदीदार किंवा व्यापाऱ्यांमध्ये अधिकचे व्यवहार होत आहेत.

दर सध्या ३५०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. परंतु शेतकऱ्यांकडून आवक कमी असल्याने या दरांचा लाभ अपवादानेच शेतकऱ्यांना होत असल्याचे दिसत आहे.

कडबा सरासरी ५ हजार रुपये प्रतिशेकडा

दादर ज्वारीचा कडबा यंदा तेजीत आहे. कडबा खरेदीसाठी गुजरात, मध्य प्रदेश, नजीकच्या छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा जिल्ह्यातील पशुपालकदेखील खानदेशात आले होते. कडब्याचे एका एकरात १७० ते १७४ पेंढ्या एवढे उत्पादन आले.

त्याचे दर उंचीनुसार कमी व अधिक होते. १० ते १२ फुटाच्या कोरडवाहू क्षेत्रातील दादर ज्वारीच्या कडब्यास साडेपाच हजार रुपये प्रतिशेकडा दर होता. तर १५ ते १६ फूट उंचीच्या कडब्यास प्रतिशेकडा सहा हजार रुपये प्रतिशेकडा दरही मिळाला.

खरेदीदारांनी थेट किंवा शिवार खरेदी केली. बाजार समित्यांत कडब्याची कुठलीही आवक खानदेशात होत नाही. यंदा कडब्याचे दर सरासरी पाच हजार रुपये राहिल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT