Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : ‘शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त लवकर करावा’

Chana Market : शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त यंदा लवकर करावा. हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी अधिक होते. परंतु खरेदी मे महिन्यात केली जाते.

Team Agrowon

Jalgaon News : शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त यंदा लवकर करावा. हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी अधिक होते. परंतु खरेदी मे महिन्यात केली जाते. पुढील महिन्यातच किंवा मार्चमध्येच खरेदी केंद्र सुरू होतील, अशी व्यवस्था करावी, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यात हरभरा विक्रीसाठी मोठा प्रतिसाद शासकीय केंद्रांत मिळतो. धुळ्यातही अशीच स्थिती असते. बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावाच्या जवळपास नसतात. सध्या दर ४५०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत. त्यात पुढे किती वाढ होईल, याबाबत अंदाज देता येत नाही.

यामुळे शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसंबंधी नोंदणीला लवकर सुरुवात करावी व हमीभावात हरभरा खरेदीस लवकर सुरुवात करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात १४ व धुळ्यात पाच खरेदी केंद्र मागील वेळेस निश्‍चित केले होते. या केंद्रांमध्ये सुमारे २५ दिवस शेतकऱ्यांकडून हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करून घेण्यात आली होती.

नोंदणीला चांगला प्रतिसात लाभल्यानंतर खरेदीचे नियोजन प्रशासनाने केले होते. नोंदणीला चांगला प्रतिसाद लाभला. परंतु खरेदीचे नियोजन झाले नव्हते. बाजारातही दरात किरकोळ घसरण दिसत होती. यामुळे मागील वेळेस अनेकांचे वित्तीय नुकसान बाजारात हरभरा विक्रीने झाले.

यंदा लवकर शासकीय खरेदीस सुरुवात करावी, अशी मागणी केली जात आहे. हरभरा रब्बीमधील प्रमुख पीक आहे. खानदेशात सुमारे सव्वा लाख हेक्टरमध्ये हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्याची पेरणी सर्वच तालुक्यांमध्ये झाली आहे.

खरेदी केंद्र संख्या पुरेशी असते. पण खरेदी उशिरा सुरू केली जाते. शासकीय केंद्रात काबुली हरभऱ्यासाठी स्वतंत्र दर असावेत. काबुली हरभऱ्याचे दर बाजारात ८५०० ते १०००० रुपये प्रतिक्विंटल, एवढे असतात. यामुळे शासकीय केंद्रात काबुली हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी स्वतंत्र दर असावेत, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT