Team Agrowon
बागायती हरभऱ्यास मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे.
भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात. त्यासाठी ३० ते ३५ दिवसांनी पहिले व दुसरे ६० ते ६५दिवसांनी पाणी द्यावे.
पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.
हरभरा पिकास तुषार सिंचनाने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. प्रमाणशीर पाणी दिल्यामुळे मूळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.
हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सें. मी. पाण्याची आवश्यकता असते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ सें.मी.) देणे महत्त्वाचे असते.
जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. जमिनीच्या मगदुरानुसार व खोलीनुसार पाण्याच्या पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार भेगा पडू देऊ नयेत.
हरभरा पिकास एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६० टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ मिळते.
Sugarcane Trash Management : ऊस पाचट कुजविण्याचे तंत्र