Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : शेतकऱ्यांनो सावधान! अनधिकृत खरेदीदारांना कापूस विक्री टाळा

Cotton Sale : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना अनधिकृतपणे कापूस खरेदी करून संबंधित शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे अदा न केल्याचे निदर्शनास आले आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना अनधिकृतपणे कापूस खरेदी करून संबंधित शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे अदा न केल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी परवाना नसलेल्या अनधिकृत कापूस खरेदीदारास कापूस विक्री करून नये असे आवाहन बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी केले आहे.

बाजार समितीने पाथरी रस्त्यावरील मोरेश्‍वर स्पिनिंग मिलद्वारा सक्सेस कॉटन इंडस्ट्रीजच्या जिनिंग मालकास २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा कापूस खरेदीचा व प्रक्रियेचा परवाना दिलेला नाही. परंतु संबंधित जिनिंग प्रेसिंगमध्ये अनधिकृतपणे परस्पर कापूस खरेदी केल्याचे बाजार समितीच्या निर्दशनास आले आहे.

संबंधित खरेदीदाराने परस्पर खरेदी केलेल्या कापसाची होणारी रक्कम शेतकऱ्यांना दिली नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी तोंडी स्वरूपात बाजार समिती संचालक मंडळाकडे केलेल्या आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित जिनिंग मालकास आपला कापूस विक्री करू नये.

संबंधितास कापूस विक्री केल्यास व पेमेंटबाबत तक्रार उद्‌भविल्यास त्यास बाजार समिती जबाबदार राहणार नसून त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित शेतकऱ्यांची राहील. याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन घुले, उपसभापती अजय चव्हाण यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT