Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : अकरा हजारांवर शेतकरी सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत

Soybean Procurement : आधी नोंदणी झालेल्या १८ हजार शेतकऱ्यांपैकी अजूनही ११ हजार १९ शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी व्हायचा आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : ः एकीकडे नोंदणीची समस्या कायम असताना आता बारदान्याचे संकट उभे होऊ लागले आहे. आधी नोंदणी झालेल्या १८ हजार शेतकऱ्यांपैकी अजूनही ११ हजार १९ शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी व्हायचा आहे. रडत रखडत चालत असलेल्या नोंदणीतील शेतकऱ्यांची त्यात भर पडणार आहे.

जिल्ह्यात हमीदराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी विदर्भ मार्केटिंगची अकरा व जिल्हा मार्केटिंगची नऊ अशी एकूण वीस केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना पुरवण्यात आलेला बारदाना आता संपत आला आहे. आणखी एक दोन दिवस पुरतील इतकाच साठा शिल्लक असल्याचे खरेदी केंद्र संचालकानी सांगितले. राज्यभरात ‘नाफेड’ची सोयाबीन खरेदी सुरू आहे. त्यासाठी ५६१ केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

१४ लाख १३ हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत साडेतीन लाख क्विंटल खरेदी झाली आहे. १५ ऑक्टोबरपासून खरेदी प्रारंभ झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४८ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी झाला आहे. तर, १८ हजारचे जवळपास नोंदणी झाली आहे. प्रत्येक केंद्रांवर पाचशेहून अधिक अर्ज नोंदणीसाठी प्रलंबित आहेत.

गेली दोन दिवस पोर्टलवरील नोंदणीची साइट बंदच होती, ती सुरू झाली असली तरी स्लो असल्याने एका अर्जाच्या नोंदणीसाठी अनेक तास लागत आहे. दर्यापूर येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या खरेदी केंद्रावर सकाळी ९ ते दुपारी ३.३० या कालावधीत १२ शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकली. प्रलंबित अर्जांची संख्या व मुदत बघता या कालावधीत त्यांची नोंदणी शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले.

आधी खरेदी करण्यात आलेला सोयाबीन केंद्रांना मिळालेल्या बारदान्यात भरण्यात आला असून आता दोन दिवस पुरू शकेल इतकाच बारदाना शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सध्या शिल्लक असलेला बारदाना संपल्यानंतर खरेदी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच ११ हजारांवर शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी शिल्लक असल्याने खरेदी बाबत अनिश्चितता वाढीस लागली आहे.

बारदान्याची समस्या

‘नाफेड’च्या सोयाबीन खरेदीत नोंदणीची अडचण असतानाच आता बारदान्यांचा प्रश्न उभा होऊ लागला आहे. एक-दोन दिवस पुरतील इतकाच बारदाना शिल्लक असून तो संपल्यावर खरेदी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार मागणी केल्यानंतरही बारदान्याचा पुरवठा होत नसल्याची तक्रार केंद्रचालकांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT