Egg Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Egg Rate : राज्यात अंडी दर पोहोचले प्रतिशेकडा ६३० रुपयांवर

Poultry Market : थंडीत झालेली वाढ त्यासोबतच शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्यात आल्याने अंडी मागणीत राज्यात वाढ नोंदविण्यात आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : थंडीत झालेली वाढ त्यासोबतच शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्यात आल्याने अंडी मागणीत राज्यात वाढ नोंदविण्यात आली आहे. त्याच्याच परिणामी अंडी दरात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असून दराने प्रतिशेकडा ६३० रुपयांचा टप्पा गाठला आहे. अहमदाबाद (गुजरात) मध्ये अंडी दर प्रतिशेकडा ६२० रुपयांवर पोहोचली आहेत. एकाच दिवसांत प्रतिशेकडा ६१५ वरून पाच रुपयांची वाढ नोंदविली गेली.

राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आहे. पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच अशाप्रकारची समिती गठीत झाली.

त्यानंतरच्या काळात पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी खंबीर भूमिका आयुक्‍त हेमंत वासेकर, सचिव तुकाराम मुंढे यांनी घेतली. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपसून प्रलंबित असलेला शालेय पोषण आहारात अंडी समावेशाच्या मागणीचा मुद्दा अवघ्या काही महिन्यांतच निकाली निघाला.

शाळांना पुरवठ्याकामी पाच रुपये प्रतिनग असा घाऊक दर अंडी खरेदीसाठी निश्‍चित करण्यात आला आहे. त्यामुळेच देशाच्या इतर भागाच्या तुलनेत महाराष्ट्रात अंडी दराने तेजी घेतली आहे. सोलापुरातील अंडी मागणी २५ हजार नगावर पोहोचली आहे. राज्याच्या इतर भागातही अशीच स्थिती आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात प्रति १०० नग अंडी ६३० रुपयांवर पोहोचली आहेत.

सरासरी ६२८ ते ६३० रुपयांचा दर मिळत असल्याने शेतीपूरक लेअर पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. शालेय पोषण आहारात समावेश कायम राहावा, अशी मागणी त्यांच्यामधून होत आहे.

महाराष्ट्रातील तेजीचा परिणाम देशातील इतर राज्यांमध्ये दिसून येत असून अजमेर (राजस्थान) मार्केटमध्ये अंडी दरात ५८९ रुपयांत १२ रुपयांची वाढ होत शेकडा दर ६०१ रुपयांवर पोहोचले. पंजाबमध्ये देखील ५८८ रुपयांपेक्षा अधिक, इंदूर (मध्य प्रदेश) ५८०, सुरत ६०० रुपये याप्रमाणे व्यवहार होत आहेत.

शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश झाल्याने मागणी वाढून दरात तेजी आली आहे. पशुसंवर्धनमंत्री, सचिवांनी यासाठी पुढाकार घेत शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या लेअर पोल्ट्री व्यवसायिकांना यातून दिलासा दिला. दर सध्या ६२८ ते ६३० रुपयांवर पोहोचले आहेत. या निर्णयापूर्वी हे दर प्रतिशेकडा ३२५ रुपये इतके कमी होते. यातून उत्पादकता खर्चाची भरपाई शक्‍य होत नव्हती.
- रवींद्र मेटकर, पोल्ट्री फार्म, अंजनगाबारी, अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT