Red Chili Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chili Market : पावसामुळे यंदा लाल मिरचीचे भाव वधारले

दिवाळी सणासुदीनंतर मिरचीची आवक वाढायला सुरुवात होते; मात्र वर्षभरासाठी मिरच्या घेताना आता गृहिणींना विचार करावा लागणार आहे.

Team Agrowon

डोंबिवली : दिवाळी सणासुदीनंतर मिरचीची (Chili) आवक वाढायला सुरुवात होते; मात्र वर्षभरासाठी मिरच्या घेताना आता गृहिणींना विचार करावा लागणार आहे. कारण बाजारपेठेत मिरचीची आवक (Chili Market) घटल्याने किमती वधारल्या आहेत. यंदा मिरचीचे भाव दुपटीने वाढले आहेत. डोंबिवलीच्‍या बाजारपेठेत लाल मिरच्‍यांना मोठी मागणी असून भाव वधारल्‍यामुळे ग्राहकांना हात आखडता घ्‍यावा लागत आहे.

परतीच्‍या पावसाचा फटका लाल मिरचीच्‍या उत्पादनाला बसला असून मिरचीचे भाव यंदा वाढलेले आहेत. भाजी, फळांबरोबर मिरचीच्या उत्पादनातही मोठी घट झाली असून लाल मिरची प्रचंड महाग झाली आहे. मिरचीची वाढती मागणी आणि कमी पुरवठा यामुळे मिरचीचे भाव वाढलेले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्‍या पावसामुळे मिरचीचे नुकसान झाले असून नवीन पीक घेण्यास वेळ असल्याने मिरचीचे भाव हे अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

साधारण मिरचीचा नवा हंगाम मार्च ते मे असा तीन महिन्यांचा असतो. त्यामध्ये सर्वात जास्त मिरचीचे उत्‍पादन हे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये होते. यंदा पाऊस लांबल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्‍टोबरमध्‍ये अति पावसामुळे मिरच्यांचे उत्पादन कमी झाले.

बेडगी मिरचीही महाग

बेडगी मिरचीसाठी तर ४७ हजारांहून अधिक रुपये क्विंटलमागे मोजावे लागत आहेत. दोन महिन्यांपूर्वी हेच मिरचीचे दर ३० हजार रुपयांवर होते. आता तेच ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात मिरची तब्बल ५५० ते ६०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. मिरचीच्या जुन्या साठ्यातील चांगल्या प्रतीची मिरची संपली आहे. दुय्यम दर्जाची मिरची कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे मिरचीची भाववाढ झाली असून डिसेंबरपर्यंत भाव असेच राहण्याची शक्यता असल्‍याचे विक्रेता आनंद पटेल यांनी सांगितले.

लाल तिखट महागणार

अनेक गृहिणी या घरच्‍या घरीच लाल तिखट तयार करतात. सुक्या मिरचीचा वापर भाज्यांसाठी किंवा इतर मसाल्यांसाठी मोठ्या प्रमाणांत केला जातो. आता मिरचीच्या किमती वाढल्याने लाल तिखटाची किमतही वाढणार आहे.

बेडगी मिरचीची चव आणि रंग हा उत्कृष्ट दर्जाचा असल्याने डोंबिवलीमध्ये बेडगी मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच गुंटूर मिरची आणि तेजा मिरची यांचीसुद्धा मागणी डोंबिवली बाजारात आहे.

- भुवन सिंग, किराणाविक्रेता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT