Edible Oil
Edible Oil agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Edible Oil : खाद्यतेल कंपन्यांचं मापात पाप बंद होणार?

टीम ॲग्रोवन

जास्त तापमानाला खाद्यतेलाचं पॅकेजिंग (Edible Oil Packaging) करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या तेल कंपन्यांना (Edible Oil Company) केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाने चाप बसणार आहे. आता तेलाच्या पाकिटावर फक्त निव्वळ वजन वा लिटर यांचाच उल्लेख करावा (तापमानाचा नाही), असा आदेश केंद्र सरकारने गुरुवारी काढला आहे. लेबलिंग दुरुस्त करण्यासाठी तेल कंपन्या आणि उद्योगांना (Edible Oil Industry) सहा महिन्यांच्या आत म्हणजेच १५ जानेवारी २०२३ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

खाद्यतेलाच्या ब्रँड्सकडून अनुचित व्यापार पद्धतींबाबत ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे.

खाद्यतेल कंपन्या पॅकेजिंग करताना नेमकं काय करतात ?

काही कंपन्या सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमानात खाद्यतेल पॅक करतात. पॅकिंग करतानाचे वाढीव तापमान खोक्यावर लिहितात. त्या तापमानाला पॅकिंग करताना त्यात एक लिटर तेल असल्याचे नमूद करतात. मात्र वाढीव तापमानाला तेलाची घनता वाढत असल्याने त्याचे आकारमान-वजनही वाढते, पण त्याचे तापमान सर्वसामान्य झाले की त्याची घनता, आकारमान आणि वजन कमी होते. त्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्षात कमी तेल मिळते. आता ही फसवणूक थांबणार आहे.

इथं सोयाबीन तेलाचं उदाहरण बघता येईल.

एक लिटर सोयाबीन तेल २१ अंश सेल्सिअस तापमानाला पॅक केलं तर त्याचं वजन ९१९.१ ग्रॅम भरतं. पण खाद्यतेल कंपन्या तेलाचं तापमान वाढवतात आणि त्यामुळे पिशवीत येणाऱ्या तेलाचं वजन कमी होतं. म्हणजे जर एक लिटर तेल ३० अंश सेल्सिअस तापमानावर पॅक केलं तर त्याच वजन ९१३ ग्रॅम होतं. एक लिटर तेल ४० अंश सेल्सिअसवर पॅक केलं तर त्याचं वजन ९०६.२ ग्रॅम होतं. तर ५० अंश सेल्सिअस तापमानावर पॅक केलेल्या तेलाचं वजन ८९९.४ ग्रॅम असतं. म्हणजे जसं तुम्ही तापमान वाढवाल तसं वजन पण कमी होत जातं. पण ग्राहक मात्र पूर्ण एक लिटर तेलाचे पैसे देतात. ही ग्राहकांची फसवणूक आहे.

आणि हे नियमांविरोधात आहे....

सध्या खाद्यतेल उत्पादक, जास्त तापमानाला खाद्यतेलाचं पॅकेजिंग करून पॅकेटवर खाद्यतेलाचं निव्वळ प्रमाणाचा (एक लिटर) उल्लेख करतात. काही उत्पादक तर हे तापमान ६० अंश सेल्सिअसपर्यंत वाढवत नेत असल्याचं आढळून आलं आहे. हे पॅकेज्ड कमोडिटी नियमांच्या विरुद्ध आहे.

लीगल मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम २०११ नुसार, सर्व प्री-पॅकेज केलेल्या वस्तूंवर वजनाच्या मानक युनिट्सनुसार निव्वळ प्रमाण नमूद करणं आवश्यक असतं. खाद्यतेल, वनस्पती तूप यांसारख्या वस्तूंचं सुद्धा निव्वळ प्रमाण त्याच्या वेष्टनावर नमूद करावं लागतं. पण खाद्यतेल उत्पादकांनी यात पळवाट काढत निव्वळ प्रमाण जाहीर करताना तापमानाचा उल्लेख केल्याचं दिसून आलं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT