Turmeric Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market : हळदीच्या तेजीला वायदे बाजार पोषक

Turmeric Futures Rate : गेल्या तीन-चार वर्षांपासून हळदीला सातत्याने कमी दर मिळाल्याने हळद उत्पादक अडचणीत सापडला होता. परिणामी हळदीचा पेरा मोठ्या प्रमाणावर कमी झाला.

Team Agrowon

Nanded News : सध्या बाजारात हळददराने तीस हजार रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठला आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून हळदीतील तेजी कायम असल्याने कमोडिटी वायदे बाजार हा पोषक ठरला असल्याचे मत शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी व्यक्त केले. सोयाबीनच्या वायदे बाजाराची बंदी शासनाने उठवावी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.

गेल्या तीन-चार वर्षांपासून हळदीला सातत्याने कमी दर मिळाल्याने हळद उत्पादक अडचणीत सापडला होता. परिणामी हळदीचा पेरा मोठ्या प्रमाणावर कमी झाला. त्यात एक महिना उशिरा मॉन्सून आल्याने पेरण्याही उशिरा झाल्या.

तसेच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळेही काही प्रमाणात उत्पन्न कमी होईल, असा अंदाज होता. या सर्व बाबींचा अंदाज लक्षात घेऊन भविष्यात हळदीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अनेकांनी वायदे बाजारात हळदीत गुंतवणूक करण्याचे ठरवले.

आगाऊ सौदे दिले त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून हळदी सातत्याने तेजीत आहे. आजघडीला सर्वसाधारण हळद १२ ते १५ हजार रुपये क्विंटल दराने विकत आहे. तर चांगली हळद वीस हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकत आहेत.

हॅन्ड पीक हळद वीस हजारांच्या पुढेच विकली जात आहे. वसमतच्या बाजारात विक्रमी ३० हजार रुपये उच्चांकी दर मिळाला. त्यामुळे हळदीला बऱ्याच वर्षांनंतर सोन्याचे दिवस आले आहेत.

परंतु हळदीतील या तेदीचा फायदा फार कमी शेतकऱ्यांना मिळाला. अनेक शेतकऱ्यांना पाच ते सहा हजार रुपये क्विंटल या दरात हळद विकावी लागली. त्यामुळे त्यांनी हळद लागवड कमी करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच परिणाम म्हणून आज बाजारात हळदीची दर वाढलेले आहेत.

भविष्यातील हळदीच्या संभाव्य तुटवड्याचा अंदाज हा वायदे बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे भविष्यातही हळदीतील ही तेजी राहण्याचा अंदाज आहे.

कमोडिटी वायदे बाजार हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. केंद्र सरकारने सोयाबीनला वायदे बाजारात दिलेली स्थगिती शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केंद्र सरकारकडे केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT