Dragon Frui Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dragon Fruit Market : ड्रॅगन फ्रूटला हंगामाच्या प्रारंभी चांगले दर

Dragon Fruit Rate : राज्यातील यंदाचा ड्रॅगन फ्रुटचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात कमी-अधिक प्रमाणात ड्रॅगन फ्रूटची विक्री सुरू झाली असून १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यातील यंदाचा ड्रॅगन फ्रुटचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात कमी-अधिक प्रमाणात ड्रॅगन फ्रूटची विक्री सुरू झाली असून १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगले दर असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जूनच्या मध्यापासून ड्रॅगन फ्रूटची आवक वाढणार असून दर टिकून राहतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात गतवर्षीपर्यंत ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र सुमारे आठ हजार एकरांवर होते. यातून अंदाजे १० हजार टनांहून अधिक ड्रॅगन फ्रूटची विक्री झाली होती. गतवर्षी जून, जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे फळांची काढणी शेतकऱ्यांनी थांबविली होती.

परिणामी, एकाच वेळी बाजारपेठेत फळे विक्रीला आली. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभी ७० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंतचा प्रतिकिलो दर मिळाला होता. मात्र अंतिम टप्प्यात आवक कमी झाल्याने मागणी वाढली. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटच्या दरात प्रति किलोस ५० ते ६० रुपयांनी वाढ झाली होती.

वर्षभरात राज्यात अंदाजे ५०० ते ६०० एकरांनी ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र वाढले असून ते आता सुमारे साडेआठ हजार एकरांपर्यंत पोहोचले आहेत. ड्रॅगन फ्रूटचा हंगाम जून महिन्यात सुरू होतो. सुमारे सहा महिने या फळांची विक्री होत असून, नोव्हेंबरअखेर हंगाम संपतो.

यंदा पोषक वातावरण असल्याने बागा चांगल्या बहरल्या आहेत. बाजारात हळूहळू ड्रॅगन फ्रूटची मागणी वाढू लागली आहे. सध्या बहुतांश भागातील फळे विक्रीला आली असून, शेतकरी फळ काढणीचे नियोजन करू लागला आहे.

...असे आहेत प्रतिकिलो दर

पांढरे ड्रॅगन फ्रूट...१०० रुपये

लाल ड्रॅगन फ्रूट ः १२० रुपये

केरळ, तमिळनाडू या राज्यांतून ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढली आहे. त्यानुसार शेतकरी नियोजन करू लागला असून, सध्या बाजारात ड्रॅगन फ्रूटची आवक वाढली आहे.
- संभाजी कोडग, ड्रॅगन फ्रूट उत्पादक, आवंढी, ता. जत, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT