Devgad Alphonso Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Unique ID Code: देवगड हापूसला ‘युनिक आयडी’; बनावट आंब्यांवर लगाम!

Devgad Alphonso: देवगड हापूसच्या नावाखाली होणाऱ्या बनावट आंब्यांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी प्रत्येक आंब्यावर ‘युनिक आयडी कोड’ असणार आहे. ग्राहक आता स्टिकर स्कॅन करून देवगड हापूसची खरी ओळख पटवू शकतात!

Team Agrowon

Pune News: देवगड हापूसच्या नावाने होणारी बनावट आंब्यांची विक्री थांबविण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे देवगड हापूस आंब्याला भौगोलिक संकेत (जीआय टॅगिंग) करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर ‘टॅपर प्रूफ सील यूआयडी’ असेल. शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हे स्टिकर लावणे बंधनकारक असणार आहे.

या प्रकल्पाकरिता ‘टीपी सील यूआयडी’चे पेटंट असलेल्या मुंबईतील ‘सन सोल्यूशन्स’ या संस्थेबरोबर देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने करार केला आहे. त्या बाबतची माहिती संस्थेचे संचालक ओंकार सप्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘‘देवगड तालुक्यातील हापूस आंबा हा एक विशिष्ट सुगंध व चवीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्या देवगड हापूसच्या नावाखाली विक्री होणारे सुमारे ८० टक्क्यांहून अधिक आंबे हे देवगडमधील नाहीत.

यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे बनावट देवगड आंब्यांची विक्री थांबविणे, हा या मागील मुख्य हेतू आहे. जीआय नोंदणी नसलेले आणि स्टिकर नसलेले आंबे कोणीही देवगड हापूसच्या नावाने विक्री करताना आढळल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’’

तपासणी कशी कराल?

आंबा देवगडचाच आहे का, हे तपासण्यासाठी ग्राहकांनी ९१६७६६८८९९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आंब्याचे आणि त्यावरील स्टिकरचे छायाचित्र पाठवावे. ही सिस्टीम त्या स्टिकरवरील कोड वाचते आणि स्टिकरच्या मागील क्रमांक लिहून पाठवण्यास सांगते. क्रमांक वाचण्यासाठी स्टिकर काढले असता त्याचे आपोआप दोन भाग होतात.

जर व्हॉट्सअॅपद्वारे आलेला संपूर्ण कोड सिस्टीममधील ‘यूआयडी’शी जुळला तर ग्राहकास शेतकरी-विक्रेत्याचे नाव, मूळ गाव, जीआय नोंदणी क्रमांक आदी तपशील पाठवला जाईल. या पडताळणीमुळे ‘देवगड हापूस’ बाबतची विश्वसनीयता वाढेल, असे सप्रे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT