Devgad Alphanso Mango : अस्सल देवगड हापूस ओळखण्यासाठी युनिक कोड

Team Agrowon

देवगड हापूसचा दर्जा राखण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक टाळण्याच्या हेतूने देवगड हापूस आंब्याला युनिक कोड देण्याचा निर्णय आंबा उत्पादक संस्थेने घेतला आहे.

Devgad Alphanso Mango | Agrowon

या निर्णयामुळे हापूसच्या नावाखाली होणाऱ्या बनावट विक्रीला पायबंद बसणार आहे.

Devgad Alphanso Mango | Agrowon

देवगड हापूसला जगभरात पंसती असल्यामुळे त्याच नावाने अन्य आंब्याची विक्री केली जाते. यामुळे ग्राहकांची फसवणूक होते आणि देवगड आंब्याविषयी ग्राहकांच्या मनात सभ्रंमाचे वातावरण निर्माण होते.

Devgad Alphanso Mango | Agrowon

हापूस आंब्याला ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या पाच जिल्ह्यांसाठी जीआय मानांकन मिळालेले आहे. बाजारात देवगड हापूसला पसंती असल्यामुळे देवगड हापूससाठी स्वतंत्र जीआय मिळावा यासाठी संस्थेने पुन्हा प्रयत्न करावेत, अशी मागणी आंबा उत्पादकांनी केली.

Devgad Alphanso Mango | Agrowon

युनिक कोड पेटंट मिळालेल्या मुंबईतील एका कंपनीबरोबर संस्थेने करार केला असल्याची माहिती संस्था अध्यक्ष श्री. गोगटे यांनी दिली. यामुळे देवगड हापूसच्या नावाने होणाऱ्या बनावट विक्रीला चाप बसणार आहे.

Devgad Alphanso Mango | Agrowon

युनिक कोडचा बनावट वापर होऊ नये म्हणून ते संस्थेकडून वितरित करण्यात येतील. प्रत्येक आंबा उत्पादकांची सातबारावरील आंबा कलमे आणि उत्पादनक्षमता तपासून जीआय धारक उत्पादकालाच युनिक कोड दिला जाणार आहे.

Devgad Alphanso Mango | Agrowon

हे पहिलेच वर्ष असल्यामुळे सर्व प्रकिया पूर्ण होण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे उत्पादकांनी १० जानेवारीपर्यंत संस्थेकडे नोंदणी करावी.

Devgad Alphanso Mango | Agrowon

Sugarcane Trash Management : ऊस पाचट कुजविण्याचे तंत्र

आणखी पाहा,,,