Resins
Resins  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

सणासुदीचे दिवस तोंडावर; तरी बेदाणा बाजार हलेना

सुदर्शन सुतार

सोलापूर ः सणासुदीचे दिवस तोंडावर असतानाही बेदाण्याचा बाजार (Resins Market) मात्र अद्याप म्हणावा तसा हललेला नाही. उलट गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५ ते १० टक्क्यांनी दरात चढ-उतार होतो आहे. बेदाण्याला प्रतिकिलोला कमाल २०० ते २३० रुपये इतका दर (Resins Rate) मिळत आहे. एकूणच देशांतर्गत बाजारात (Domestic Resins Market) सध्या मंदीचे वातावरण आहे, असे असले तरी येत्या काही दिवसांत मात्र दर आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

देशात महाराष्ट्रात बेदाण्याचे सर्वाधिक उत्पादन होते. यंदा महाराष्ट्रात सुमारे १ लाख ४५ हजार टनांपर्यंत बेदाण्याचे उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. त्यात मुख्यत्वे सोलापूर, सांगली आणि नाशिक या तीन जिल्ह्यांत सर्वाधिक उत्पादन होते. यंदाच्या द्राक्ष हंगामात द्राक्षाचा बाजार कोसळल्याने बऱ्यापैकी द्राक्ष बेदाण्याला गेली. त्यामुळेही उत्पादनात वाढ झाल्याचे सांगण्यात येते. यंदा सोलापूर जिल्ह्यात सुमारे ५० हजार टन, सांगली जिल्ह्यात ४० हजार टन आणि नाशिक जिल्ह्यात ३० हजार टन तर विजापूर (कर्नाटक) मध्ये २५ हजार टन बेदाणा तयार झाल्याचे सांगण्यात आले. साधारण जुलैपासून ऑक्टोबरपर्यंतच्या तीन-चार महिन्यांपर्यंत बेदाण्याचे लिलाव होतात. यंदा आतापर्यंत दोन महिन्यांत सुमारे ८५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. अद्याप जवळपास ६० हजार टन बेदाण्याची विक्री बाकी आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरात ५ ते १० टक्क्यांनी घट

बेदाणा बाजारात पहिल्या प्रतीच्या गोल्डन रंगाच्या बेदाण्याला प्रतिकिलो कमाल २०० ते २३० रुपये आणि दुसऱ्या प्रतीच्या चॅाकलेट रंगाच्या बेदाण्याला १५० ते २०० रुपये दर मिळतो आहे. तर तिसऱ्या प्रतीच्या बेदाण्याला ५० ते ७० रुपये दर मिळतो आहे. गेल्यावर्षी कमाल दर २५०-२७० रुपयांच्याही पुढे होता. यंदा तीनही प्रतीच्या बेदाण्यांचे दर साधारण ५ ते १० टक्क्यांनी उतरले आहेत. पण येत्या काळात गौरी-गणपती, दसरा आणि दिवाळीसारख्या सणउत्सवांमुळे दरात वाढ होईल, अशी अपेक्षा या उद्योगाला आहे.

खारीबावलीसह पंढरपूर, तासगावात सौदे

देशात खारीबावली (दिल्ली) आणि महाराष्ट्रात सोलापूर बाजार समिती, पंढरपूर बाजार समिती (सोलापूर), सांगली बाजार समिती, तासगाव बाजार समिती (सांगली) या बेदाण्याच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. या प्रत्येक बाजार समितीत बेदाण्याच्या सौद्यासाठी ठराविक दिवस ठरवून दिले आहेत. त्यानुसार इथे व्यवहार होतात. पण सध्या या बाजारपेठात आवक चांगली आहे, पण दर मात्र अद्याप पुरेशा प्रमाणात हललेले नाहीत.

बेदाणा बाजारात सध्या मंदीचे वातावरण आहे. अर्थात, त्यासाठी विविध कारणे आहेत. मूळात ग्राहकांचा खरेदीचा कल हे एक कारण आहेच. पण दरातील चढ-उतार फारसा नाही, आणखी दीड-दोन महिने हातात आहेत. त्यामुळे दर वाढण्याबाबत अपेक्षा आहेत.
सचिन भोसले-गवळी, बेदाणा उत्पादक व निर्यातदार, सोलापूर
व्यापाऱ्यांकडून दिवाळीची खरेदी आता जवळपास सुरू झाली आहे. पंढरपुरात आठवड्याच्या सौद्याला १२५ गाड्यांपर्यंत आवक होते. त्यातील ७० टक्के बेदाण्याचे व्यवहार होतात. यंदा दरात थोडाफार चढ-उतार आहे, पण दर आणखी वाढतील, अशी अपेक्षा आहे.
आनंद शेटे, बेदाणा व्यापारी, पंढरपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT