Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate Today: भाव कमी असल्याने अमेरिकेच्या कापसाला मागणी; आयात ६ पटीने वाढली

US Cotton Import: भारतामध्ये कापसाचे दर दबावात असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन कापूस आणखी स्वस्त झाला आहे. परिणामी फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान अमेरिकेहून कापसाची आयात तब्बल ६ पटीने वाढली आहे.

Anil Jadhao 

Pune News: देशात यंदा कापसाचे दर दबावात आहेत. मात्र अमेरिकेत व्यापार युध्दामुळे भाव पडलेले आहेत. भाव कमी असल्याने भारतात अमेरिकेच्या कापसाची आयात तब्ब ६ पटीने वाढली. मागील तीन महिन्यात अमेरिकेतून १ लाख ५५ हजार गाठींची आयात झाली. अमेरिकेत आजही भाव कमीच आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या कापसाची आयात सुरुच राहील, असे आयातदारांनी सांगितले. 

भारतात यंदा शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळत आहे. कापसाचे भाव मागील चार वर्षात कमीच झाले आहेत. देशातील बाजारात सध्या कापसाला सरसारी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. पण बाजारातील शेतकऱ्यांच्या कापसाची आवक खूपच कमी झाली. त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून येत आहे. यंदा बहुतांशी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात कापूस विकावा लागला. तरीही आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव आपल्यापेक्षा कमीच आहेत. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युध्द सुरु केले. त्यामुळे अमेरिकेत कापसाचे भाव आणखी कमी झाले. अमेरिकेचा कापूस स्वस्त असल्याने भारतासह आशियातील देशांनी अमेरिकेच्या कापसाची आयात वाढवली. भारतातही मागील ३ महिन्यांमध्ये अमेरिकेतून आयात होणाऱ्या कापसाचे प्रमाणा वाढले आहे. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अमेरिकेच्या कापसाची आय़ात ६ पटीने वाढली. या तीन महिन्यात भारताने १ लाख ५५ हजार गाठी (एक गाठ १६० किलो) कापसाची आयात केली. गेल्या वर्षी याच तीन महिन्यांमध्ये अमेरिकेतून भारतात केवळ २५ हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आयात झाली होती. 

अमेरिका चीनच्या तणामुळे भाव कमी

अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये व्यापार युध्दामुळे तणाव निर्माण झाला. अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या वस्तुंवर आयात शुल्क वाढवले. ५४ टक्क्यांपासून वाढ करत काही वस्तुंवर ही वाढ २४५ टक्क्यांपर्यंत केली. चीननेही अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीला उत्तर देत अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तुंवर शुल्क वाढवले. त्यामुळे अमेरिकेतून कापसाची होणाऱ्या निर्यातीवरही परिणाम झाला होता. परिणामी भावावर दबाव वाढला. त्यात भारतात बाजारातील आवक कमी झाल्यामुळे दरात सुधारणा झाली. त्यामुळे अमेरिकेचा कापूस आणखी स्वस्त झाला. परिणामी अमेरिकेतून कापसाची आयात वाढत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT