Market Update Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sweet Potato Market : कर्नाटकच्या रताळ्यांना मागणी

Sweet Potato Rate : बेळगावातून रताळ्यांची सुमारे ५० टन आवक झाली होती. या वेळी एका किलोला तीस ते चाळीस रुपये दर मिळाला आहे.

Team Agrowon

Chakan News : नवरात्रोत्सवामुळे येथील महात्मा फुले बाजारात रविवारी (ता. ६) बेळगावातून रताळ्यांची सुमारे ५० टन आवक झाली होती. या वेळी एका किलोला तीस ते चाळीस रुपये दर मिळाला आहे.

राज्यात पावसाने, पुराने रताळ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने परराज्यातील रताळी बाजारात विक्रीसाठी येत आहे. घाऊक बाजारात रताळी चाळीस रुपये किलो आहेत. किरकोळ बाजारात रताळी प्रतिकिलोला ६० ते ८० रुपये भावाने विकली जात आहे. हे दर संतुलित असल्याचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे, व्यापारी रवींद्र बोराटे यांनी सांगितले.

राज्यातील सातारा व इतर भागातील तसेच गुजरात राज्यातील रताळ्यांच्या पिकाला या वर्षी अधिक पावसाने फटका दिल्याने काढणी रखडली आहे. तसेच काही सडून नुकसान झाले. त्यामुळे रताळी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. श्रावण महिना, कृष्ण जन्माष्टमी तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रताळ्याला मोठी मागणी असते. परंतु यंदा पावसाने रताळी पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी, शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

लाल मातीतील पारंपरिक वाणाच्या रताळ्याचे सातारा परिसरात तसेच गडहिंग्लज, बेळगाव, कोल्हापूर, पुणेच्या काही भागांत रताळ्याचे पीक घेतले जाते. स्थानिक बाजारपेठांबरोबर इतर राज्यातही रताळ्याला मोठी मागणी आहे. जूनमध्ये लागवड केलेल्या आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला काढणीस येणाऱ्या या पिकातून कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी या पिकाची निवड करतो. रताळ्याचे वेल जनावरांना चारा म्हणूनही देतात. या वर्षी रताळ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात अतिपावसाने घटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT