Sweet Potato Cultivation : उपवासासाठी फायदेशीर असलेल्या पौष्टिक रताळ्यांची लागवड

Team Agrowon

रताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी. टेकडीच्या उतारावरील वरकस जमिनीत हे पीक घेता येईल.

Sweet Potato Cultivation | Agrowon

लागवडीकरिता जमीन १५ ते २५ सें.मी. खोलीपर्यंत नांगरून किंवा खोदून घ्यावी. ६० सें.मी. अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत.

Sweet Potato Cultivation | Agrowon

लागवड करण्यासाठी कोकण अश्‍विनी, वर्षा किंवा श्रीवर्धनी या जातींचा वापर करावा. लागवड जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करावी.

Sweet Potato Cultivation | Agrowon

लागवडीसाठी वेलांच्या शेंड्याकडील व मधल्या भागातील बेणे निवडावे. बेण्याची लांबी २० ते ३० सें.मी. असावी, त्यावर तीन ते चार डोळे असावेत.

Sweet Potato Cultivation | Agrowon

एका गुंठा क्षेत्रासाठी वेलाचे ८०० तुकडे लागतात. लागवड करताना बेणे वरंब्यावर २५ सें.मी. अंतरावर लावावे. प्रत्येक ठिकाणी एक फाटा (बेणे) लावावे.

Sweet Potato Cultivation | Agrowon

लागवड केल्यानंतर १५ दिवसांनी पहिली बेणणी करावी. दुसरी बेणणी लागवड केल्यापासून ३० दिवसांनी करावी. त्याच वेळी वेलांना रासायनिक खतांचा दुसरा हप्ता देऊन भर द्यावी.

Sweet Potato Cultivation | Agrowon

लागवडीनंतर सुमारे साडेतीन ते चार महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी.

Sweet Potato Cultivation | Agrowon
आणखी पाहा...