Rose Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Rose Flower Demand : ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे गुलाब फुलांना उठाव

Valentine Day : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर बाजारात गुलाबाची आवक वाढली आहे. उठाव असल्याने दरही टिकून आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर बाजारात गुलाबाची आवक वाढली आहे. उठाव असल्याने दरही टिकून आहेत. शनिवारी (ता. १०) जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव व अन्य शहरांतील बाजारांत गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी राहिली.

बुधवारी (ता. १४) ‘व्हॅलेंटाइन डे’ आहे. त्यासंबंधी फुलांची मागणी बाजारात मागील बुधवारीच (ता. ७) सुरू झाली. फुलांची आवक जळगाव तालुक्यातील शिरसोली, आसोदा, भुसावळातील विविध गावांतून होत आहे. जळगाव शहरातील वल्लभदास वालजी व्यापारी संकुलातील फूल बाजारात मागील दोन-तीन दिवस प्रतिदिन सरासरी २५ हजार नग गुलाब फुलांची आवक झाली आहे.

गुलाबाचे दर नोव्हेंबरमध्ये प्रतिनग दोन ते तीन आणि कमाल पाच रुपये होते. डिसेंबरमध्ये दर सरासरी दोन रुपये प्रतिनग असे मिळाले. जानेवारीत लग्नसराईमुळे दर प्रतिनग तीन ते पाच रुपये काही दिवस मिळाले. परंतु या काळात आवकही कमी होती.

अनेक शेतकऱ्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर गुलाब फुलांची काढणी व अन्य व्यवस्थापन केले. यामुळे आवक या आठवड्यातच वाढली आहे. आवक वाढली, पण दरही टिकून आहेत. शेतकऱ्यांकडून सरासरी पाच ते सात रुपये प्रतिनग व सरासरी पाच रुपये प्रतिनग या दरात गुलाबांची खरेदी केली जात आहे.

त्यांची पाठवणूक काही अडतदार नागपूर, अमरावती, गुजरातमधील सुरत, अहमदाबाद, बडोदा व राज्यात करीत आहेत. किरकोळ बाजारात गुलाबाच्या फुलांचे दर प्रतिनग १३ ते १५ रुपये आहेत. किरकोळ बाजारातील दरही मागील काही दिवसांत वधारल्याचे सांगण्यात आले.

खरेदीदारांकडून आगाऊ नोंदणी

दर्जेदार गुलाबांची आवक बाजारात होत आहे. त्यांचे दर टिकून असल्याने शेतकऱ्यांचा जानेवारीत झालेला तोटा किंवा कमी नफा भरून निघण्यासही मदत होत आहे. काही शेतकरी थेट किरकोळ खरेदीदारांना गुलाबाची पाठवणूक जळगाव, चाळीसगाव व भुसावळ आदी शहरांत करीत आहेत.

त्यात आठ ते नऊ रुपये प्रतिनग दर मिळत आहे. वल्लभदास वालजी व्यापारी संकुलातील अडतदारांनी देखील गुलाबाच्या पाकळ्या निर्मिती, हार, गुच्छ निर्मिती सुरू केली आहे. खरेदीदारांकडून आगाऊ नोंदणी येत आहे. त्यासंबंधीची कार्यवाही या व्यापारी संकुलात सध्या वेगात सुरू आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT