Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market: मका यंदाही भाव खाणार; इथेनाॅलसाठी मक्याला मागणी कायम

Maize Rate : सरकारने मक्यापासून इथेनाॅल निर्मितीला प्रोत्साहन दिल्यापासून चांगला उठाव मिळत आहे. मागील काही महिन्यांपासून मक्यामध्ये तेजी होती.

अनिल जाधव

Pune News : सरकारने मक्यापासून इथेनाॅल निर्मितीला प्रोत्साहन दिल्यापासून चांगला उठाव मिळत आहे. मागील काही महिन्यांपासून मक्यामध्ये तेजी होती. पण खरिपाचा माल बाजारात आल्यानंतर दर दबवात आले. मात्र यंदाही इथेनाॅलची मागणी कायम राहण्याचा अंदाज असून मक्याच्या भावात सुधारणेचे संकेत आहेत.

मक्याला चांगला मिळत असल्याने कापसाखालील बरेच क्षेत्र मक्याकडे वळाले. मक्याची लागवड यंदा जवळपास ५ टक्क्यांनी वाढली. गेल्या खरिप हंगामात जवळपास ८५ लाख हेक्टरवर मका लागवड होती. यंदा मक्याची लागवड जवळपास ८९ लाख हेक्टरवर पोचली. मका लागवडीच्या काळातही मक्याचे भाव तेजीत होते. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र वाढले.

मागील हंगामात मक्याला इथेनाॅलसाठी चांगली मगाणी वाढली होती. देशात पोट्रोलमध्ये इथेनाॅल मिश्रणाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सरकारने खाण्यास अयोग्य धान्यापासून इथेनाॅल निर्मितीला परवानगी दिली होती.

इथेनाॅलसाठी तांदळाचा वापर देशात वाढत होता. पण मागील हंगामात देशात तांदळाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे भाव वाढले. इथेनाॅल कंपन्यांना तांदळापासून इथेनाॅल मिर्मिती करणे परवडत नव्हते. त्यामुळे धान्यापासून इथेनाॅल निर्मिती कमी झाली.

सरकारने इथेनाॅलचे उद्दीष्ट साध्या करण्यासाठी मक्यापासून इथेनाॅल मिर्मितीला प्रोत्साहन दिले. त्यासाठी मक्याच्या इथेनाॅलचे भाव वाढवले. त्यामुळे इथेनाॅलसाठी मक्याला चांगली मागणी आली. मक्याला इथेनाॅल, पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाची मागणी आली. परिणामी मक्याचे भाव मागील काही महिन्यांपासून वाढले होते.

नव्या आवकेचा दबाव

देशातील बाजारात सध्या खरिपातील मक्याची आवक येत आहे. पण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये आजही मक्याचे भाव हमीभाव किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. केवळ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात भाव हमीभावापेक्षा काहीसे कमी दिसत आहेत. कारण या दोन्ही राज्यांमध्ये मक्याचे उत्पादन चांगले होते. या दोन्ही राज्यांमध्ये सध्या मक्याला सरासरी १८०० ते २ हजारांचा भाव मिळत आहे.

यंदाही मक्याला मागणी

मक्याला यंदाही इथेनाॅलसाठी मागणी राहणार आहे. कंपन्या मका खरेदी करत असल्याने ऐन आवकेच्या हंगामातही मक्याचा बाजार टिकून आहे. सध्या जास्त ओलावा असलेला मका बाजारा १३०० रुपयांपासून विकला जात आहे. पण गुणवत्तेचा मका आजही हमीभाव म्हणजेच २ हजार २२५ रुपयाने विकला जात आहे. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर मक्याच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT