Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : लासलगावच्या मक्याला जम्मू-काश्मीरमध्ये मागणी

Maize Rate : कांद्यासाठी नाशिक जिल्ह्यातील लासलगावची बाजारपेठ आशिया खंडात प्रसिद्ध आहे. देशभर तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणीनुसार कांदा पाठविला केला जातो.

मुकूंद पिंगळे

Nashik News : कांद्यासाठी नाशिक जिल्ह्यातील लासलगावची बाजारपेठ आशिया खंडात प्रसिद्ध आहे. देशभर तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणीनुसार कांदा पाठविला केला जातो. मात्र आता या कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगावातून जम्मू- काश्मीरमधील बारी ब्राह्मणा येथे पोल्ट्री उद्योगाच्या मागणीनुसार २६०० टन मक्याची पहिली खेप रेल्वेद्वारे पाठविण्यात आली आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मक्याची आवक वाढत आहे. प्रामुख्याने कुक्कुटखाद्य, स्टार्च प्रक्रिया व इतर ठिकाणी मागणीनुसार पाठवला जात होता. यंदा जिल्ह्यातून पहिल्यांदाच मक्याची खेप लासलगाव येथील व्यापारी सागर थोरात यांच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमधील पोल्ट्री उद्योगाच्या मागणीनुसार सांबा जिल्ह्यातील बारी ब्राह्मणा येथे मका पाठवण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रात दिवसेंदिवस मक्याची लागवड वाढत असून शेतकऱ्यांनी एकरी उत्पादन वाढवण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र नव्याने मका उत्पादनाचे आगार म्हणून नावारूपाला येत आहे.

लासलगावच्या मक्याला पसंती

बोरी ब्राह्मणा येथील कुक्कुटपालन संबंधी काम करणारे घटक कुक्कुट खाद्यासाठी लागणाऱ्या मक्याची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्ह्यातील येवला, सटाणा, मनमाड या भागात पाहणी केली.

मात्र प्रतवारीच्या अनुषंगाने लासलगाव येथील मका पसंतीला आल्याने त्यांनी येथील मक्याची नोंदवली असल्याचे शुभ्रा मार्केटिंगचे संचालक व मका व्यापारी सागर थोरात यांनी सांगितले. प्रतवारी, पॅकिंग व वाहतूक खर्च पाठवण्यासह २,४५० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे व्यवहार करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT