Jaggery Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Market : श्रावणाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये गुळाला मागणी

Jaggery Rate : गेल्या पंधरवड्यापासून क्विंटलला २०० रुपयांची वाढ झाली आहे. गुळास क्‍विंटलला ३७०० ते ४३०० रुपयापर्यंत दर मिळत आहे.

Raj Chougule

Kolhapur News : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये गुळाला मागणी वाढल्याचा सकारात्मक परिणाम गुळाच्या दरवाढीवरही झाला आहे. गेल्या पंधरवड्यापासून क्विंटलला २०० रुपयांची वाढ झाली आहे. गुळास क्‍विंटलला ३७०० ते ४३०० रुपयापर्यंत दर मिळत आहे. गुळास सरासरी क्विंटलला ४००० रुपये इतका दर मिळत असल्‍याचे येथील बाजार समितीच्या गूळ विभागातून सांगण्यात आले.

सध्‍या गुळाचा हंगाम नसला तरी बारमाही गूळ उत्पादन करणाऱ्या गुऱ्हाळघरांतून गुळाची आवक सुरू आहे. बाजार समितीत एक दिवसाआड गुळाचे सौदे सुरू आहेत. कर्नाटकात मध्यंतरीच्या पावसामुळे गुऱ्हाळे बंद झाली. यामुळे कर्नाटकातूनही गुळाची आवक थंडावली आहे. कोल्हापूर जिल्‍ह्यात सध्या सुमारे २५ गुऱ्हाळे सुरू आहेत. या गुऱ्‍हाळांमधून एक दिवसाआड ९ ते १० हजार गूळ रव्यांची आवक होत आहे.

पंधरवड्यापासून हळूहळू दर वाढत असले तरी गेल्या चार दिवसांत गुळाच्या दराने ४००० रुपयांचा टप्पा पार केला आहे. बाजार समितीत स्‍पेशल व पहिल्या दर्जाच्‍या गुळाची क्वचित आवक होत आहे. दुसऱ्या दर्जाच्या गुळास ४१०० ते ४२००, तर तिसऱ्या दर्जाच्या गुळास ३८०० ते ४१०० रुपये दर मिळत आहे. चौथ्या दर्जाच्या गुळास ३६०० ते ३७०० रुपयांहून अधिक दर मिळत आहे.

गुजरातमध्ये वाढलेली गुळाची मागणी हीच प्रमुख बाब गुळाच्या दरवाढीसाठी अनुकूल ठरली आहे. येथून पुढील काही दिवसांमध्ये सर्वत्र सणासुदीचे दिवस सुरू होत आहे. प्रामुख्याने गुजरातमध्ये या कालावधीत गुळाचा वापर विविध पदार्थांच्‍या निर्मितीसाठी केला जातो.

या पार्श्वभूमीवर अनेक किरकोळ व्यापारीही गुळाची मागणी नोंदवतात. सध्या तेथील शीतगृहातही गुळाची उपलब्धता कमी आहे. अनेक व्यापाऱ्यांनी गेल्या महिनाभरात शीतगृहातील गुळाची विक्री केली. सध्या तिथला साठा संपत आल्‍याने सध्या उत्पादकांकडून विक्रीस येणाऱ्या गुळास चांगला दर मिळत आहे.

जितका गूळ येईल तितक्या गुळास मागणी असल्याने येथील व्‍यापारीही लवकरात लवकर गूळ गुजरातला पाठविण्यासाठी गडबड करीत आहेत. कर्नाटकातही मध्यंतरीच्या पावसामुळे गुळाची आवक कमी आहे. यामुळे कोल्हापूर भागातून जितका गूळ तयार होईल तितकी विक्री होत असल्‍याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

गुळाच्या दरात गेल्या चार दिवसांत चांगलीच वाढ झाली आहे. सणांमुळे मागणी कायम राहण्याचा अंदाज आहे. किमान गणेशोत्सवापर्यंत तरी मागणी कायम राहील. दरही चांगले राहतील अशी शक्यता आहे.
- के. बी. पाटील, गूळ विभाग प्रमुख, कोल्हापूर बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Policy : कांदा धोरण समितीला मुदतवाढ; वर्षे सरले, तरीही अहवाल नाही

Grape Disease Management: बुरशीजन्य, जिवाणूजन्य करपा नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय

Ladki Bahin Yojana: ९२ लाख लाडक्या बहिणींची नावे वगळली? 'हा तर महिलांचा विश्वासघात', वडेट्टीवारांची टीका

Soybean Crop Management: ‘एल निनो’ परिस्थितीत कोरडवाहू सोयाबीन व्यवस्थापन

Indian Pomegranate Export: अमेरिकेच्या बाजारपेठेत भगव्या डाळिंबाला संधी

SCROLL FOR NEXT