Fodder Shortage Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fodder Shortage : नगर बाजार समितीत हिरव्या चाऱ्याला मागणी

Water Scarcity : सध्या बाजार समितीत ऊस, मका, कडवळ या हिरव्या चाऱ्याला टनाला तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत, तर घास तीन हजार रुपये प्रति हजार पेंढी दराने विकला जात आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक भागांत दमदार पाऊस झाला. मात्र, हिरवा चारा उपलब्ध व्हायला अजून किमान वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधी जाणार असल्याने नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मका, कडवळ, घास, उसाची आवक कायम आहे. शेतकरी, पशुपालकांकडून मागणीही कायम असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाला तरी उन्हाळ्यात असलेले हिरव्या चाऱ्याचे दर कमी झालेले नाहीत. सध्या बाजार समितीत ऊस, मका, कडवळ या हिरव्या चाऱ्याला टनाला तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत, तर घास तीन हजार रुपये प्रति हजार पेंढी दराने विकला जात आहे.

साधारण पाच ते सात टनांपर्यंत दररोज हिरव्या चाऱ्याची येथे विक्री होत आहे. जिल्ह्यात पशुपालनाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे हिरव्या चाऱ्याला अधिक मागणी असते. आठ दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांत दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र, अद्यापही जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम आहे.

मृगाच्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. मात्र, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न अजून कायम आहे. पावसाने अशीच साथ दिली, तर पुढील महिनाभरात हिरवा चाऱ्याचा प्रश्न सुटेल, असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. सध्या मात्र हिरव्या चाऱ्याला उन्हाळ्यातील दराप्रमाणेच पैसे मोजावे लागत आहेत.

रोहिणीबरोबरच मृग नक्षत्र चांगला बरसल्याने शेतकरी बांधवांनी मका, कडवळ, घास, मूर घास, बिन्नी गवताची लागवड सुरू केली आहे. या चाऱ्याला किमान एक ते दीड महिन्याने जनावरांना वापरता येणार असल्याने सध्यातरी शेतकरी बांधवांना तीन हजारांच्या दरातच हिरवा चारा खरेदी करावा लागणार आहे. वैरणीचे भावही वाढलेले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT