Flower Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Flower Market : दिवाळीमुळे फुलांना मागणी वाढली

Floriculture : गुलाब, गुलछडी व गजऱ्यांच्या फुलांना दर चांगले होते. अन्य फुलांना मात्र अपेक्षित दर मिळाला नाही.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : येथील बाजार समितीत दिवाळीमुळे फुलांना चांगली मागणी राहिली. बाजार समितीत शेवंती, झेंडू, ॲस्टर या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने ॲस्टर, शेवंती, झेंडूला मागणी राहिली.

गुलाब, गुलछडी व गजऱ्यांच्या फुलांना दर चांगले होते. अन्य फुलांना मात्र अपेक्षित दर मिळाला नाही. झेंडूच्या फुलांच्या दरात काहीशी घसरण झाली. पाडव्याला फुलांना मागणी चांगली असते. त्यामुळे दर काय राहील याकडे लक्ष लागले आहे.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीसाठी जिल्हाभरातून फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. बाहेरच्या जिल्ह्यातील फुलांच्या व्यापाऱ्यांनी नगरच्या बाजार समितीत फुले खरेदी केली.

बाजारात गुलछडीला १४ ते १६ हजार, गुलाबाला १८ ते २५ हजार, तर गजऱ्यांच्या फुलांना ४० ते ५० हजार रुपये प्रती क्विंटलला भाव मिळाला.

शेवंतीला ६ हजार, गुलाबाला ८ हजार, तर गजऱ्यांच्या फुलांना ३० ते ४० हजार रुपयांचा भाव मिळाला होता. इतर फुलांमध्ये गलांडा दोन अडीच हजार, झेंडू तीन ते पाच हजार, शेवंती साडेतीन ते पाच हजार, ॲस्टर पाच ते सात हजार, जर्बेरा तीन ते पाच हजार, लिली दोन ते अडीच हजार, तुळजापुरीला दोन ते अडीच हजार रुपयांचा भाव मिळाला.

झेंडू फुलांना अधिक मागणी असते. यंदाही मागणी चांगली होती. यंदा दसऱ्याला झेंडूसह अन्य फुले मातीमोल दरात विक्री करावी लागली. शेवटी न विकलेली फुले फेकून द्यावी लागली. दिवाळीत तशी परिस्थिती आली नाही.

मात्र दर फार नव्हते. आता दिवाळी पाडव्यालाही फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे आज, पाडव्याला काय दर मिळतोय याकडे लक्ष लागले आहे. लक्ष्मीपूजनादिवशी नगर, सोलापूर भागांतील काही शेतकऱ्यांनी फुले आणून नगर जिल्ह्यात विकली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT