Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement Delay: तुरीच्या शासकीय खरेदीस विलंब; खुल्या बाजारात तुरीची उलाढाल वाढली

Tur Market Update: तुरीच्या शासकीय खरेदीसाठी आदेश निघाले असले तरी प्रत्यक्ष खरेदीचा मुहूर्त गवसलेला नाही. परिणामी, शेतकऱ्यांना तूर खासगी बाजारात हमीभावाच्या तुलनेत कमी दराने विकण्याची वेळ आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News: शासकीय तूर खरेदीचे आदेश निघाले असले तरी प्रत्यक्षात मुहूर्त मात्र गवसलेला नाही. हमीभावाच्या अपेक्षेने प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी त्यांच्यावर खासगी बाजारपेठेत तूर विकण्याची वेळ आली आहे. अमरावती बाजार समितीत गेल्या दीड महिन्यात १ लाख ३० हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे.

कोरडवाहू पट्ट्यात कापूस, सोयाबीन व तूर ही खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत. यंदा तीनही पिकांचे बाजारमूल्य कमालीचे घसरले आहे. राज्य सरकारने सोयाबीनची शासकीय खरेदी केली. मात्र उद्दिष्टांपेक्षा निम्मे सोयाबीनच खरेदी होऊ शकले.

कापसाची खरेदी सीसीआयमार्फत करण्यात येत असली तरी गेल्या एक आठवड्यापासून तांत्रिक कारण देत ती रखडली आहे. आता तुरीची शासकीय खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी २४ जानेवारीस आदेश निर्गमित झाले असले तरी केवळ नोंदणी सद्यःस्थितीत सुरू आहे. प्रत्यक्ष खरेदीचे आदेश काढण्यात आले असून १३ फेब्रुवारीपासून खरेदी प्रारंभ करण्याचे आदेश आहेत.

मात्र खरेदी अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही. जिल्ह्यात वीस केंद्रांवर खरेदी करण्यात येणार आहे. या केंद्रांना खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात ३९ हजार ६५४ टन खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात १ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे.

पंचवीस टक्के तूर खरेदी करणार

कृषी विभागाने जिल्ह्याची सरासरी उत्पादकता १३६० किलो प्रति हेक्टर काढली असून, यंदा १ लाख ५८ हजार ६९६ टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. या उत्पादकतेवर आधारित पंचवीस टक्के तूर खरेदी करण्यात येणार आहे.

हमीदराच्या तुलनेत प्रति क्विंटल अडीचशे रुपये कमी दर

हमीदराने तूर विकता येईल, या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. शासनाने दिलेल्या उद्दिष्टांनुसार ३९.६५ टन तूर खरेदी केली जाणार आहे. अमरावती बाजार समितीत १ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत सरासरी ७२०० रुपये प्रतिक्विंटल दराने १३० टन तुरीची उलाढाल झाली आहे. हमीदराच्या तुलनेत प्रतिक्विंटल अडीचशे रुपये कमी दर मिळत आहेत. शासकीय तूर खरेदी सुरू होईस्तोवर जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट बाजार समितीमध्येच संपण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT