Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement: खुल्या बाजारात तुरीची उलाढाल वाढली

Market Update: तुरीच्या शासकीय खरेदीला विलंब होत असल्याने शेतकरी हमीदराच्या प्रतीक्षेत असतानाही खुल्या बाजारात विक्री करायला भाग पडत आहेत. अमरावती बाजार समितीत जानेवारीपासून आतापर्यंत १.३० लाख क्विंटल तूर दाखल झाली असून, सरकारने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक तूर बाजार समितीतच विकली जाण्याची शक्यता आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News: शासकीय तूर खरेदीचे आदेश निघाले असले तरी प्रत्यक्षात मुहूर्त मात्र गवसलेला नाही. हमीदराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी त्यांच्यावर खासगी बाजारपेठेत तूर विकण्याची वेळ आली आहे. अमरावती बाजार समितीत गेल्या दीड महिन्यात १ लाख ३० हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे.

कोरडवाहू पट्ट्यात कापूस, सोयाबीन व तूर ही खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत. यंदा तीनही पिकांचे बाजारमूल्य कमालीचे घसरले आहे. राज्य सरकारने सोयाबीनची शासकीय खरेदी केली. मात्र उद्दिष्टांपेक्षा निम्मे सोयाबीनच खरेदी होऊ शकले. कापसाची खरेदी ‘सीसीआय’मार्फत करण्यात येत असली तरी गेल्या एक आठवड्यापासून तांत्रिक कारण देत ती रखडली आहे. आता तुरीची शासकीय खरेदी करण्यात येणार आहे.

त्यासाठी २४ जानेवारीस आदेश काढण्यात आले असले तरी केवळ नोंदणी सद्यःस्थितीत सुरू आहे. प्रत्यक्ष खरेदीचे आदेश काढण्यात आले असून १३ फेब्रुवारीपासून खरेदी प्रारंभ करण्याचे आदेश आहेत. मात्र खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. जिल्ह्यात वीस केंद्रांवर खरेदी करण्यात येणार आहे.

या केंद्रांना खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात ३९ हजार ६५४ टन खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात १ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे. कृषी विभागाने जिल्ह्याची सरासरी उत्पादकता १३६० किलो प्रति हेक्टर काढली असून यंदा १ लाख ५८ हजार ६९६ टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. या उत्पादकतेवर आधारित पंचवीस टक्के तूर खरेदी करण्यात येणार आहे.

दरम्यान, हमीदराने तूर विकता येईल, या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. शासनाने दिलेल्या उद्दिष्टांनुसार ३९.६५ टन तूर खरेदी केल्या जाणार आहे. अमरावती बाजार समितीत १ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत सरासरी ७२०० रुपये प्रतिक्विंटल दराने १३० टन तुरीची उलाढाल झाली आहे. हमीदराच्या तुलनेत प्रतिक्विंटल अडीचशे रुपये कमी दर मिळत आहेत. शासकीय तूर खरेदी सुरू होईस्तोवर जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट बाजार समितीमध्येच संपण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT