CCI Cotton Procurement  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

MSP Procurement Center : हमीभाव खरेदी केंद्रांचा प्रचार करावा

CCI Cotton Procurement : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाची सीसीआय मार्फत व्यवस्थित खरेदी होत नसल्याच्या संदर्भाने अर्थसंकल्पी अधिवेशनात आमदार देशमुख व आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते.

Team Agrowon

Latur News : शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी केंद्राची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी प्रचार व प्रसार करावा, असा आग्रह माजीमंत्री अमित देशमुख यांनी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे धरला. मुंबई मंत्रालयात आयोजित बैठकीत देशमुख यांनी कापूस व इतर शेतीमाल उत्पादकता वाढवण्यासाठी शासनाने बाजार समितीमार्फत मार्गदर्शक यंत्रणा उभारावी, अशी मागणीही केली.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाची सीसीआय मार्फत व्यवस्थित खरेदी होत नसल्याच्या संदर्भाने अर्थसंकल्पी अधिवेशनात आमदार देशमुख व आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर रावल यांनी आमदारांसोबत बैठक घेऊन चर्चा केली.

काही तांत्रिक कारणामुळे नऊ फेब्रुवारी रोजी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने सुरू असलेल्या काही कापूस खरेदी केंद्रावर खरेदी प्रक्रिया विस्कळित झाली होती मात्र त्यानंतर १२४ खरेदी केंद्रावर कापूस खरेदीची प्रक्रिया नियमित सुरू राहिली, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापूस त्यांनी कमी किमतीत विक्री करू नये यासाठी कापूस खरेदी केंद्र, कधी ? आणि कुठे ? सुरू होणार आहेत याची शासनाने व्यापक प्रमाणात प्रसिद्ध करावी. शेतकऱ्यांना कापूस उत्पादनातून फायदा मिळावा यासाठी निर्यातक्षम कापसाची लागवड करण्यासाठीही शासन आणि बाजार समिती मार्फत मार्गदर्शन करावे,

कापूस व इतर शेतीमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी, योग्य पद्धतीचे मार्गदर्शन करणारी यंत्रणाच शासन व बाजार समितीच्या वतीने उभारण्यात यावी, शेतीमालाच्या हमीभाव खरेदी केंद्रांना मंजुरी देताना त्यात होणारा गोंधळ संपुष्टात आणावा आदि सूचना आमदार देशमुख यांनी केल्या. रावल यांनी या सर्व सूचनांचे स्वागत करून त्या संबंधाने योग्य कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही या प्रसंगी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: कर्जाचा भस्मासुर झटपट श्रीमंतीचे मृगजळ

Flower Farming : शेतकऱ्यांनो, फुलशेतीतून मिळवा वर्षभर हमखास उत्पन्न; जाधव यांनी मांडले यशाचे गणित!

CM Relief Fund : सामाजिक बांधिलकी! ‘छत्रपती शाहू शिक्षण’ संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २५ लाखांची मदत

Rabi Sowing : पेरणीचा वेग वाढला! रब्बीची तब्बल ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण

Flower Drop Problem: सोलापूर जिल्ह्याती द्राक्ष बागांना फुलगळ अन्‌ कुजीचा फटका!

SCROLL FOR NEXT