Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Production: कापूस उत्पादनाच्या अंदाजात पुन्हा कपात; सीसीआयची खरेदी १०० लाख गाठींवर पोचणार

CCI Cotton Procurement: देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाजात पुन्हा कपात करण्यात आली आहे. सीसीआयची खरेदी ९५ ते १०० लाख गाठींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कापूस उत्पादनात आघाडीवर असून गुजरातमध्ये घट झाली आहे.

Anil Jadhao 

Pune News: देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज पुन्हा कमी करण्यात आला. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने जानेवारी महिन्यात ३०४ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज दिला होता. मात्र फेब्रुवारीच्या अंदाजात पुन्हा कपात करून ३०१ लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाजात दिला. तर सरकारने २९९ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज दिला आहे. तर सीसीआय यंदा ९५ ते १०० लाख गाठी कापूस खरेदी करण्याची शक्यता आहे, असे काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनी सांगितले.

काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने यंदा सुरुवातीपासूनच उत्पादनाचा अंदाज कमी दिला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या अंदाजात देशात ३०२ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला होता. मात्र जानेवारी महिन्यातील अंदाजात काहीशी वाढ केली आणि उत्पादनाचा अंदाज ३०४ लाख गाठींवर नेला होता. मात्र एकाच महिन्यात अंदाजात पुन्हा कपात केली. नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजात पुन्हा कपात केली आणि उत्पादन ३०१ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज दिला आहे.

काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनी सांगितले की, नुकत्याच असोसिएशनच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत उत्पादनाच्या अंदाजाविषय़ी चर्चा करण्यात आली. उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थानमधील उत्पादनात २.५ लाख गाठींनी कपात करण्यात आली आणि उत्पादन २८ लाख गाठींवर स्थिरावला आहे. गुजरातमधील उत्पादनही ५ लाख गाठींनी कमी होऊन ७५ लाख गाठींवर स्थिरावले. तर तेलंगणातील उत्पादनात ५ लाख गाठींची वाढ झाली असून ४७ लाख गाठींवर पोचल्याचे गणात्रा यांनी सांगितले.

महाराष्ट्र आघाडीवर

देशात यंदा महाराष्ट्रात उत्पादन ९० लाख गाठींवर पोचण्याचा अंदाज आहे. गुजरातमधील उत्पादन यंदा कमी झाले. गेल्या काही वर्षांपुर्वी गुजरातमध्ये उत्पादन १०० लाख गाठींवर होत होते. मात्र आता उत्पादन कमी होत आहे. यंदा उत्पादन ७५ लाख गाठींवरच स्थिरावण्याचा अंदाज आहे. तर तेलंगणातही यंदा उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे.

सीसीआयची खरेदी वाढणार

सीसीची खरेदी देशात आतापर्यंत ९० लाख गाठींच्या पुढे गेली. खुल्या बाजारात कापसाचा भाव कमी असल्याने शेतकरी जास्तीत जास्त माल सीसीआयला देत आहेत. त्यामुळे सीसीआयची खरेदी वाढत आहे. सीसीआय ९५ ते १०० लाख गाठींची खरेदी करेल, असाही अंदाज अतूल गणात्रा यांनी यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

Chief Secretary Review: नोंदणी, मुद्रांक विभागाचा मुख्य सचिवांकडून आढावा

Ajit Pawar Condolence Meeting: दादांच्या योगदानाबाबत बारामतीत कृतज्ञता व्यक्त

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

SCROLL FOR NEXT