Cotton Rate | Cotton purchase in Gujarat Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : अकोट बाजार समितीत कापूस खरेदी पूर्ववत

बाजार समितीत विक्रीला आलेल्या हलक्या कापसाची सौदापट्टीवर नोंद करण्याच्या कारणामुळे व्यापारी व प्रशासनात वाद निर्माण झाला. ६ डिसेंबरपासून खरेदी थांबली होती. अखेरीस जिल्हा उपनिबंधकांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. त्यानंतर गुरुवारपासून खरेदी सुरू झाली.

टीम ॲग्रोवन

अकोट, जि. अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Akot APMC) कापूस खरेदी (Cotton Procurement) पूर्ववत झाल्यानंतर हळूहळू शेतकरी कापूस विकायला आणत आहेत. येथे कापूस ८३०० ते ८८०० रुपये प्रतिक्विंटलने विकत आहे. गुरुवारी (ता. १५) सुमारे ५५० क्विंटल कापसाची विक्रीसाठी आवक झाली.

बाजार समितीत विक्रीला आलेल्या हलक्या कापसाची सौदापट्टीवर नोंद करण्याच्या कारणामुळे व्यापारी व प्रशासनात वाद निर्माण झाला. ६ डिसेंबरपासून खरेदी थांबली होती. अखेरीस जिल्हा उपनिबंधकांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. त्यानंतर गुरुवारपासून खरेदी सुरू झाली.

नऊ दिवस बाजार बंद असल्याने आवक थांबली होती. आता बाजार उघडताच हळूहळू आवक सुरू झाली. कापूस खरेदी सुरू करण्यात आली असून, कास्तकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कापसाची बाजारपेठ पुन्हा गजबजू लागली आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत एकूण ३१ वाहनातून अंदाजे ५५० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

आता बाजारात प्रामुख्याने कोरडवाहू पट्ट्यातील कापूस विक्रीला येणार आहे. सध्या या पट्ट्यातील कापूस वेचणी जोमाने सुरू झालेली नाही. जानेवारीत हा कापूस मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होते. त्या काळात बाजारात कापसाची आवक वाढेल, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT