Market Update  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : कापूस वायदे पुन्हा पडले; कापूस, सोयाबीन, मका, तसेच काय आहेत डाळिंब दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, ज्वारी, डाळिंब आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये आज नरमाई आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे गेल्या साडेतीन वर्षातील निचांकी पातळीवर पोचले. कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ७२.८० सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ५६ हजार ३६० रुपये प्रतिखंडीवर होते.

बाजारातील आवक टिकून असून दरपातळीही कायम दिसते. कापसाचा भाव सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस दरातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज मोठी नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत ११.८४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड पुन्हा एकदा ३५६ डाॅलर प्रतिटनांपर्यंत नरमले.

तर देशातील बाजारात सोयाबीनची आवक टिकून आहे. बाजारातील भावपातळी ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनची ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

बाजारातील डाळींबाची आवक टिकून आहे. आवकेत जास्त प्रमाणात चढ उतार दिसत नाहीत. डाळींब पिकाला यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्याचा परिणाम बाजारातील आवकेवर होत आहे. त्यामुळे डाळिंबाची भावपातळीही कायम आहे.

उचांकी भाव काही ठिकाणी १५ हजार ते काही ठिकाणी २५ हजार रुपये दिसत आहे. पण डाळिंबाला सध्या सरासरी ८ हजार ते १० हजार रुपयांचा सरासरी भाव मिळत आहे. ही भावपातळी आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ज्वारीचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमलेले आहेत. रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर आवक वाढून ज्वारीच्या भावावर दबाव आला होता. ज्वारीचा पेरा काहीसा वाढल्याने उत्पादन वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

तर उत्पादकता कमी राहील्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पण बाजारातील आवक वाढल्याने २ हजार ३०० ते ३ हजारांचा भाव मिळत आहे. हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे. ज्वारीवरीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात. त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे अभ्यासकांनी सांगितले. 

मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून एका भावपातळीच्या दरम्यान दिसत आहे. देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे. पोल्ट्री, इथेनाॅल आणि स्टार्च उद्योगाकडून मका खरेदी केला जात आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. मक्याला २ हजार १०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT