Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market: केळी आवकेत सतत घट

Banana Price: खानदेशात गेल्या आठवड्यापासून केळीची आवक सतत घटत आहे, तरीही बाजारात दर अस्थिर आहेत. उत्तरेकडील स्पर्धा आणि मागणीतील घसरण यामुळे दर कमी राहिले असून सरासरी दर १४०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात केळी आवकेत मागील सात ते आठ दिवसांत सतत घट झाली आहे. परंतु केळी दर अस्थिर असून, किमान ९००, कमाल १९०० तर सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे.

आठ ते १० दिवसांपूर्वी खानदेशात थेट खरेदीत केळीचे कमाल दर २१०० ते २२०० रुपये व किमान दर ११०० रुपयांवर होते. सरासरी दरपातळी १७०० रुपयांपर्यंत होती. केळी आवकेतही मागील काही दिवसांत सतत घट झाली आहे. खानदेशात सध्या १८० ते १८५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.

रावेर, यावल, मुक्ताईनगर या केळी पट्ट्यातही आवकेत सतत घट झाली आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील केळी आवकही कमी झाली आहे. परंतु केळी दर मात्र वधारलेले नाहीत. त्यात घट झाली आहे.

उत्तरेकडे केळीची मागणी घटली आहे. तसेच उत्तरेकडे अन्य भागातूनही केळी पाठविली जात आहे. यामुळे खानदेशातील केळीसमोर स्पर्धा असून, केळी दरांवर त्याचा परिणाम झाल्याची माहिती आहे. दर्जेदार केळी खानदेशात काढणीवर आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या बाजारातही केळी आवकेत घट झाली आहे. पण तेथील बाजारात लिलावामध्ये केळीला कमी दर मिळाल्याची माहिती आहे. तेथे केळीचे कमाल किंवा उच्चांकी दर १९०० रुपयांवर आहेत. तर किमान दर ९०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. तेथे सध्या प्रतिदिन ८० ते ८५ ट्रक (एक ट्रक १० ते १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. पुढे खानदेशात केळी आवकेत आणखी घट होईल, असे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यांकडे मागणी

FFS Fertilizer Booking System: खत ‘ऑनलाइन बुकिंग’ला नऊ जिल्ह्यांमध्ये सुरुवात

Farm Loan Waiver Lists: दर पंधरा दिवसांनी कर्जमाफीच्या याद्या येणार: मुख्यमंत्री फडणवीस

Wheat Export Ban Lifts: केंद्र सरकारने गहू निर्यातीवरील बंदी उठविली

Pune Rain: घाटमाथ्यावर तुरळक सरी

SCROLL FOR NEXT