Cotton Procurement  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Procurement : ढगाळ वातावरणामुळे ‘सीसीआय’ची कापूस खरेदी बंद

Cloudy Weather : दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने जागेअभावी तात्पुरती कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे.

Team Agrowon

Hingoli News : जिल्ह्यात सीसीआय केंद्रावर साडेसात हजार शेतकऱ्यांचा एक लाख २५ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने जागेअभावी तात्पुरती कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे.

पांढरे सोने म्हणून ओळखला जाणाऱ्या कापसाचा पेरा अलीकडच्या काळात घटला तर सोयाबीन, हळदीच्या क्षेत्रात भर पडली. परंतु, गत दोन वर्षांत सोयाबीनवर बेलोमीकचा प्रादुर्भाव होत आहे. शिवाय ऐन काढणीच्या वेळी अवकाळीचा माराही होत असल्याने उत्पादनात प्रचंड घट होत आहे.

तसेच, बाजारात भावही समाधानकारक मिळत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना लागवड खर्च ही वसूल होत नसल्याचे चित्र आहे. यावर्षी जिल्ह्यात ३३ हजार ९३८ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. साधारणतः सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कापूस वेचणीला प्रारंभ झाला, परंतु, सीसीआयचे खरेदी केंद्र नोव्हेंबरमध्ये सुरू झाले.

उशिरा का होईना खुल्या बाजारपेक्षा क्विंटलमागे जवळपास पाचशे रुपयांचा दर अधिक मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला सीसीआय केंद्रावर सात हजार ४७१ रुपयांचा भाव आहे.

हिंगोली शहराजवळील लिंबाळा (मक्ता), वसमत जवळील हयातनगर फाटा, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार आणि शिरडशहापुर या चार केंद्रावर एक लाख २९ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली येथील केंद्रावर ३० हजार क्विंटल, वसमत ३१ हजार, जवळा बाजार २० हजार, शिरडशहापुर ५१ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT