Chana Crop Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Sowing : दीड लाख हेक्टरवर होणार हरभऱ्याची पेरणी

यंदा रब्बीच्या क्षेत्रात वाढ होऊन दोन लाख हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने नियोजन केले आहे. या वेळी सर्वाधिक दीड लाख हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी होण्याचा अंदाज आहे.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : यंदा रब्बीच्या क्षेत्रात (Rabi Sowing Acreage) वाढ होऊन दोन लाख हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने (Agriculture Department) नियोजन केले आहे. या वेळी सर्वाधिक दीड लाख हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी (Chana Sowing) होण्याचा अंदाज आहे. याशिवाय गहू, ज्वारी, मका आदी पिकांची लागवड केली जाणार आहे.

जिल्ह्यात यंदा खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकऱ्यांची भीस्त रब्बी हंगामवार आहे. खरिपातील खर्च रब्बीत भरून काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे. त्यामुळेच रब्बी हंगामात अपेक्षितपेक्षा जास्त वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. कृषी विभागाने रब्बी हंगामाचे नियोजन केले असून, दोन लाख सहा हजार ७१० हेक्टरवर रब्बी हंगामाची लागवड होण्याचा अंदाज आहे.

यात हरभरा एक लाख ४५ हजार हेक्टर, गहू ४५ हजार, ज्वारी दोन हजार ५००, तर मका एक हजार दोनशे, इतर बारा हजार ८५० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सार्वजनिक व खासगी असे मिळून ७५ हजार ९८० क्विंटल हरभऱ्याचे बियाणे, गव्हाचे ४६ हजार ५४३ क्विंटल, असे सर्व मिळून एक लाख २२ हजार ९९७ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध

रब्बीत पेरा वाढणार असल्याने महाबीजने यंदा लवकरच बियाणे कृषी सेवा केंद्रापर्यंत पोहोचविले आहे. इतर कंपन्यांचे बियाणेही गावागावांत पोहोचले आहे. परतीच्या पावसामुळे अजूनही सोयाबीन निघालेले नाही. त्यामुळे पेरणीला उशीर होत आहे. सध्या सोयाबीन काढणीला वेग आला असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणीला गती येण्याचा अंदाज आहे. यासाठी आवश्यक असलेले बियाणे मुबलक असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT