Chana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Sowing : देशातील हरभरा पेरणीचा वेग कमीच; लागवडीची आघाडी गेल्यावर्षीपेक्षा एक टक्क्यापेक्षाही कमी

Chana Market : देशातील रब्बीची पेरणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत हरभऱ्यातील पेरणी गेल्यावर्षीपेक्षा एक टक्कानेही आघाडीवर नाही.

Anil Jadhao 

Pune News : देशातील रब्बीची पेरणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत हरभऱ्यातील पेरणी गेल्यावर्षीपेक्षा एक टक्कानेही आघाडीवर नाही. आतापर्यंत देशात जवळपास ९४ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धुसर झाली असल्याची चर्चा बाजारात सुरु आहे.

हरभरा भाव मागील काही महिन्यांपासून महीभावापेक्षा जास्तच आहे. गेल्या दोन महिन्यात तर हरभरा भाव ८ हजारांच्या दरम्यान पोचले होते. मात्र सरकारने पिवळा वाटाणा आयात मुक्त केली. तसेच हरभरा आयातही विक्रमी पातळीवर पोचली. त्यामुळे हरभरा भाव कमी होण्याला मदत झाली. मात्र तरीही हरभरा भाव एका पातळीवर टिकून होते. हरभरा भावातील तेजी कमी झाली तरी हमीभावापेक्षा जास्त भाव होता.

सरकारने यंदा हरभऱ्याला ५ हजार ६५० रुपये हमीभाव जाहीर केला. बाजारात गेल्या ७ महिन्यांपासून हरभरा भाव हमीभावापेक्षा जास्त होते. रब्बी पेरण्या सुरु झाल्या तेव्हाही दर चांगले होते. त्यामुळे यंदाच्या रब्बीत हरभरा पेरा वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच यंदा रब्बी पेरणीसाठी पोषक हवामान होते. पाऊसमानही चांगले होते. त्यामुळे पेरणीत वाढ होण्याची शक्यता दाट झाली होती.

प्रत्यक्ष पेरणी सुरु झाली तेव्हा सुरुवातीच्या काळात गेल्यावर्षीपेक्षा हरभरा पेरणी यंदा आघाडीवर होती. पण जसजसे पेरणी पुढे गेली तसे आघाडी कमी होत गेली. आता तर हरभरा लागवड गेल्यावर्षीपेक्षा केवळ ८१ हजार हेक्टरने अधिक दिसते. हरभऱ्यातील तेजी लक्षात घेऊन पेरणी वाढेल, या चर्चेचा दरावरही परिणाम झाला होता. त्यामुळे हरभरा भाव आणखी कमी होतील, असा अंदाज गृहीत धरून पेरा वाढील ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे.

बाजारभावाचा अंदाज

देशात मागील हंगामातील हरभऱ्याचा शिल्लक स्टाॅक नाही. त्यामुळे यंदा हरभरा पुरवठ्याची भीस्त उत्पादनावरच असेल. तसेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज आहे. याचा फटका उत्पादनाला बसू शकतो. त्यामुळे उत्पादनाविषयी लगेच भाष्य योग्य ठरत नाही. पण यंदा हरभरा बाजाराला हमीभावाचा मजबूत आधार आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT