Chana Rate
Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : ३३ हजार शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी

Team Agrowon

Chana Market Update : लातूर व जालना या दोन्ही ठिकाणच्या बाजारपेठा हरभरा खरेदीसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. या दोन्ही ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये १५ मे अखेरपर्यंत ३३ हजार ५०७ शेतकऱ्यांकडून ५ लाख १४९३ क्विंटल हरभऱ्याची आधारभूत किमतीने खरेदी केली गेली आहे.

प्रत्यक्ष बाजारात मात्र अजूनही आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानेच हरभऱ्याची खरेदी केली जात असल्याची स्थिती आहे. त्यामुळे आधारभूत किमतीने हरभरा खरीदी केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी झालेली खरेदी समाधानकारक ठरली आहे.

यासंदर्भात जालना जिल्हा पणन अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात १२ आधारभूत किमतीने हरभरा खरेदी केंद्रावरून १९,४६२ शेतकऱ्यांनी आपला हरभरा आधारभूत किमतीने खरेदी केला जावा म्हणून नोंदणी केली होती. त्यापैकी १८९६० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविले गेले.

प्रत्यक्ष खरेदीचे एसएमएस मिळाल्यानंतर सर्व १२ केंद्रांवरून १४,९५६ शेतकऱ्यांकडे २ लाख ३४ हजार ६३५ क्विंटल हरभऱ्याची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली.

खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी १ लाख ९१ हजार ३१२ क्विंटल ५० किलो हरभरा गोडाऊनमध्ये साठविण्यात आला, तर ४३३२ क्विंटल ५० किलो हरभरा अजूनही गोडाऊनमध्ये साठविणे बाकी होते.

लातूर जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी १६ केंद्र सुरू करण्यात आली.

या सर्व केंद्रांवरून २४५०७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. या सर्व शेतकऱ्यांना आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठीचे प्रत्यक्ष एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी १८५५१ शेतकऱ्यांकडे २ लाख ६६ हजार ८५८ क्विंटल १२ किलो हरभऱ्याची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली.

खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी २ लाख ४१ हजार ७७७ क्विंटल हरभरा गोडाऊनमध्ये साठविण्यात आला. तर २५ हजार ८१ क्विंटल १२ किलो हरभरा अजूनही गोडाऊनमध्ये साठविणे बाकी होते.

खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी १ लाख ७९ हजार ६६३ क्विंटल ५० किलो हरभऱ्याच्या रकमेचे ५३३५ रुपये प्रतिक्विंटल या दराने चुकारेही अदा करण्यात आले. ८७,१९४ क्विंटल ६२ किलो हरभऱ्याचे चुकारे देणे बाकी असल्याचे लातूर जिल्हा पणान अधिकाऱ्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT