Chana, Jowar and Wheat Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Jowar Sowing : हरभरा, ज्वारी, गव्हाला शेतकऱ्यांची रब्बीत पसंती; लागवड क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा आघाडीवर 

Rabi Season : देशातील रब्बी पेरण्या सरासरीच्या ७८ टक्के पूर्ण झाल्या. आतापर्यंत देशात ४९३ लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला. त्यात हरभरा, गहू, भात आणि ज्वारीची पेरणी गेल्यावर्षीच्या तुलनेत आघाडीवर आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशातील रब्बी पेरण्या सरासरीच्या ७८ टक्के पूर्ण झाल्या. आतापर्यंत देशात ४९३ लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला. त्यात हरभरा, गहू, भात आणि ज्वारीची पेरणी गेल्यावर्षीच्या तुलनेत आघाडीवर आहे. तर तेलबिया पिकांची पेरणी पिछाडीवर आहे. हरभरा पेरणी गेल्यावर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी आघाडीवर आहे.

देशात यंदा पाऊसमान चांगले असल्याने रब्बी पेरणीसाठी पोषक हवामान आहे. पण यंदा खरिप पेरणीला अनेक भागात उशीर झाला होता. त्यामुळे पिकांची काढणी उशीरा झाली आणि रब्बी पेराही उशीरा सुरु झाला. मात्र तरीही रब्बी पेरणीची गती गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी पेरण्या रेंगाळल्या होत्या. त्यामुळे यंदा रब्बी पेरणीची गती जास्त दिसत आहे.

देशात ९ डिसेंबरपर्यंत एकूण सरासरी रब्बी क्षेत्राच्या ७८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दीड टक्क्याने रब्बीची पेरणी आघाडीवर आहे. त्यातही गहू आणि हरभरा पेरणीला यंदा पसंती दिसत आहे. गव्हाची जवळपास ७६ टक्के पेरणी पूर्ण झाली. गव्हाचा पेरा २३९ लाख ४९ हजार हेक्टरवर झाला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाचा पेरा २.२८ टक्क्यांनी आघाडीवर आहे. भाताची लागवडही अडीच टक्क्यांनी आघाडीवर असून ११ लाख १९ हजार हेक्टरवर भात पीक आहे.

हरभरा पेरणीही यंदा आघाडीवर आहे. गेल्या काही महिन्यांपासून हरभऱ्याचे बाजारभाव हमीभावापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे हरभरा पेरणीला शेतकऱ्यांची पसंती दिसत आहे. हरभऱ्याचा पेरा गेल्यावर्षीच्या तुलनेत ७.१४ टक्क्यांनी आघाडीवर आहे. हरऱ्याची पेरणी ८६ लाख हेक्टरवर झाली. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ८० लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला होता.

कडधान्य पेरा आघाडीवर

कडधान्याचे भाव देशात गेल्या वर्षभरापासून चांगले आहेत. त्यामुळे रब्बीत शेतकऱ्यांनी कडधान्य पिकाला पसंती दिल्याचे सध्यातरी दिसत आहे. कडधान्याचा पेरा गेल्यावर्षीच्या तुलनेत ४.२७ टक्क्यांनी आघाडीवर दिसत आहेत. त्यातही हरभरा पेरा वाढलेला आहे. मात्र रब्बी मूग आणि उडदाची लागवड कमी झाली आहे. उडदाची लागवड १५ टक्क्यांनी आणि मुगाची लागवड जवळपास ५० टक्क्यांनी पिछाडीवर आहे. 

तेलबियांचा पेरा पिछाडीवर

देशात गेल्या काही महिन्यांपासून तेलबिया पिकांचे भाव दबावात आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा कल तेलबिया पिकांकडे कमी दिसून आला. मोहरीच्या भावावरही काही प्रमाणात दबाव आहे. परिणामी मोहरीची लागवड ५ टक्क्यांनी पिछाडीवर दिसत आहे. मोहरीचा पेरा आतापर्यंत ८१ लाख हेक्टरवर झाला. तसेच भुईमूग, तीळ, जवस या तेलबियांची लागवडही गेल्यावर्षीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. 

महत्वाच्या पिकांची लागवड (लाख हेक्टरमध्ये)
पीक…२०२४…२०२३…टक्के
गहू…२३९.४९…२३४.१५…२.२८
भात…११.१९…१०.९३…२.३७
हरभरा…८६…८०…७.५
मोहरी…८१…८४.७०… (-४.३६)
मका…१०.०७…१०.०५…०.१९
ज्वारी…१९.३८…१८.३२…५.७८

एकूण कडधान्य…१२०.६५…११५.७०…४.२७
एकूण तेलबिया…८६.५२…९०.४५…४.३४
एकूण भरडधान्य…३५.७७…३५.०८…१.९६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana in Polyhouse: पॉलिहाऊसमध्ये केळीचे उत्पादन घेणे फायदेशीर ठरते का?

Jaltara Project: जलतारा उभारणीसाठी विशेष मोहीमॲग्रोवन वृत्तसेवा

Soybean Procurement: बारा लाख टन सोयाबीन खरेदीचे आव्हान

Maharashtra ZP Election Voting: ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य 'ईव्हीएम'मध्ये बंद, कुठे किती मतदान?

Radhakrishna Vikhe Patil: आधुनिक तंत्रज्ञानातूनच शेतीचे भविष्य उज्ज्वल : विखे पाटील

SCROLL FOR NEXT